रा.जि.प. भापट शाळेत स्वातंत्रदिन उत्साहात संपन्न..



म्हसळा : प्रतिनिधी
                 दि‌. १५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ७.३० वाजता रा.जि.प. भापट शाळेतील ध्वजारोहण भापट गावाचे ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. शंकरराव भिकु बेटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरी दरम्यान स्वातंत्रदिनानिमित्त घोषणा देण्यात आल्या. यानंतर बालसभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. शंकरराव भिकु बेटकर साहेब होते. सर्वप्रथम या वर्षी पावसाच्या अतिवृष्टीमुळे नाहक बळी गेलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
                   शाळेचे उपशिक्षक श्री. जयसिंग बेटकर यांनी सभेचे प्रास्ताविक सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजय केंद्रे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शालेय चिमुकल्यांनी सुस्वर आवाजात ईशस्तवन, स्वागतगीत तसेच देशभक्तीपर गीते सादर केली.
              त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी सुंदररित्या आपली भाषणे सादर केली. उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात शालेय विद्यार्थ्यांचे व चांगल्या गोष्टींचे कौतुक केले.

              या स्वातंत्रदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पेन व इतर साहित्य वाटप केले. यावेळी श्रमजीवी संस्था दापोली-रत्नागिरी, विजय हनुमान मंडळ खरसई, शिक्षणप्रेमी समाजसेवक किशोर येलवे, माजी कर्णधार गणेश मुकनाक, यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षणप्रेमी श्री. अंकुशजी कलबटे यांनी दोन गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व इतर साहित्य दिले. यावेळी कार्यक्रमासाठी श्री. शंकर बेटकर, ग्रां.पं. सदस्य रविंद्र कुवारे, गजानन पाष्टे, वंदना मोहिते, गाव अध्यक्ष प्रविण ठोंबरे, उपाध्यक्ष कमळेश बेटकर, बौद्धजन मंडळ अध्यक्ष लक्ष्मण मोहिते, शा.व्य. अध्यक्षा भाविका जोशी, उपाध्यक्षा रंजिता कुवारे, ग्रामस्थ नथुराम घडशी, विनोद जोशी, प्रमोद बेटकर, सोनु जोशी,  धोंडु भोसले, सोनु बेटकर, गोविंद घडशी, मोहन भोसले, माहिल नजिर, अमित जोशी, शा.व्य. समिती सदस्या दृष्टी अलिम, रसिका अलिम, महिला अध्यक्षा राजश्री बेटकर, शोभा मोहिते, अंगणवाडी सेविका अनुजा अलिम इ. मान्यवर उपस्थित होते.
                 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‌ व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजय केंद्रे सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा