संजय खांबेटे : म्हसळा
१५ ऑगस्ट २०१९ रोजीचा भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात आणि आंनदी वातावरणात साजरा करण्यात आला.तालुक्यातील ध्वजारोहण कार्यक्रम सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था,विविध शासकीय कार्यालय, शाळा, कॉलेज,पंचायत समितीचे संबंधीत लोकप्रतिनिधी,संस्था अध्यक्ष,समिती अध्यक्ष आणि अधिकारी वर्गाचे शुभहस्ते संपन्न झाले.प्रामुख्याने मराठी मुलांची शाळा येथील ध्वजारोहण शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती मयुरी बनकर,अंजुमन हायस्कूलमध्ये चेअरमन नासिर मिठागरे,सार्वजनिक वाचनालयामध्ये अध्यक्ष संजय खांबेटे,न्यु इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्य एम.बी.माळी,वसंतराव नाईक कॉलेजमध्ये मानद सचिव फझल हलदे,पंचायत समितीचे सभापती छाया म्हात्रे, म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षा फळकनाझ हुर्जुक, जिजामाता शिक्षण संस्थेचे माजी सभापती महादेव पाटील, आदिंंसह म्हसळा तालुका मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण कन्या शाळा प्रांगणात तहसीलदार शरद गोसावी यांचे हस्ते झाले या वेळी तालुका शहरातील सर्वच शासकीय व निमशासकीय अधिकारी,कर्मचारी,लोकप्रतिनिधी,विध्यार्थी, शिक्षक,ग्रामस्थ बंधु भगिनी मोठया संख्येने सहभागी झाले होते.स्वातंत्र्य दिनाचे औचित्याने म्हसळा नगर पंचायतीमध्ये सुंदर म्हसळा स्वच्छ म्हसळा करण्याबाबतची स्वच्छता निरीक्षक सुमित आदमाने यांनी माहिती दिली.तहसीलदारांचे शासकीय कार्यक्रमात तंबाखू मुक्त महाराष्ट्र करण्याची सामुहिक शपथ घेण्यात आली.


Post a Comment