रा.जि.प. भापट शाळेत बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन..


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा - केंद्र पाष्टी मधील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापट या शाळेत शाळास्तरीय बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जास्तीत जास्त पोषक वातावरण निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांना चित्रकलेबद्दल आवड, अभिरुची निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून शालेय विभागाने हाती घेतलेले उपक्रम अतिशय सुंदर असुन या माध्यमातून रा.जि.प. शाळा  भापट केंद्र पाष्टी ता. म्हसळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी १००% सहभाग घेऊन बालचित्रकला स्पर्धा उपक्रम‌ यशस्वी केले आहे. यावेळी शाळेचे उपशिक्षक, कलाशिक्षक श्री. जयसिंग बेटकर सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजय केंद्रे सर यांनी शाळा स्तरावर नियोजन केले. गटशिक्षणाधिकारी श्री. शेडगे सर आणि पाष्टी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बी. आर. आडे सर यांचे बालचित्रकला स्पर्धेविषयी मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा