संजय गांधी निराधार योजने अंर्तगत म्हसळ्यातील 29 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुर.


संजय खांबेटे : म्हसळा- प्रतिनिधी
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना म्हसळा तालुका समितीची बैठक प्रकाश रायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेला  सदस्य सचिव तथा तहसीलदार शरद गोसावी, नायब तहसीलदार के.टी. भिंगारे, सदस्य प्रकाश कोठावळे,अनिल टिंगरे,यशवंत म्हात्रे,अस्मिता हेंगिस्टे,विस्तार अधिकारी चौधरी,अव्वल कारकून विशाल भालेकर,श्रीमती सरिता लिमकर,नुतन गोविलकर आदी उपस्थित होते.सभेत संजय गांधी योजने मधील 29 लाभार्थींच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली.यामध्ये संजय गांधी अपंग योजनेचे 15,संजय गांधी विधवा योजनेचे 04,श्रावण बाळ योजनेमधील 10 लाभार्थींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.वरिल मंजुर लाभार्थ्यांपैकी 40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या लाभार्थीला प्रतिमहा रु.800/-अनुदान,80%पेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्याना प्रतिमाह 1000/-रुपये आणि अन्य योजनेतील लाभार्थी यांना शासनाच्या वतीने प्रतिमाह 600 रुपये अनुदान देण्यात येत आसल्याचे विशाल भालेकर यानी सांगितले.आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने म्हसळा तालुका संजय गांधी योजना समितीने गरीब गरजु लाभार्थी शासनाच्या लाभापासुन वंचित न रहाण्यासाठी लौकर मिटींग घेतल्याचे अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा