संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
विद्यार्थी हा शालेय जीवनापासून परीपूर्ण असावा , शैक्षणिक पाया मजबुत व्हावा त्याच बरोबर राजकीय दृष्टीकोनातून विद्यार्थी परीपूर्ण व्हावा त्यातूनच लोकशाहीतील महत्वाचा घटक असलेली निवडणूक प्रक्रियेची जाणीव व्हावी, भविष्यात निवडणूक प्रक्रियेबाबत माहीती, करावे लागणारे मतदान यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता लागयला नको म्हणून म्हसळा शहरातील म्हसळा शाळा नं. १चे विद्यार्थ्यानी निवडणुकीचे धडे घेतले .
म्हसळा शाळा नं.१ ने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय स्वराज्य सभा निवडणूक कार्यक्रम शाळेच्या मुख्या ध्यापिका श्रीमती शुभदा दातार यांच्या निवडणूक निर्णय अधिकारात निवडणूक पार पडली. या साठी २ री ते ४थी च्या विद्यार्थीनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला .यत्ता १ली ते ४ थी च्या १५७ पटापैकी २ री ते ४थी च्या११५ विद्यार्थीनी निवडणुक प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेतला.चैतन्य पाष्टे 31 मताने विजयी झाला व त्याची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली, अन्य मंत्री पुढील प्रमाणे सोनल बुरपल्ले, श्रावणी नांदगावकर, निरज शिंदे, निरजा धोत्रे, वैदही निगुडकर, तनुष्का कदम, आर्य करडे, श्रावणी तांदळेकर, श्रध्दा सांगळे यांची विविध खातेपदी निवड झाली.
या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शुभदा दातार यानी व अन्य सहकारी शिक्षक श्री. राजेंद्र मालुसुरे, श्रीमती सुनेत्रा खेडेकर,कल्पना पाटील व वंदना खोत यानी निवडणूक कार्यक्रम, मतदार यादी प्रसिध्द करणे , मतपत्रिका छापणे, निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी निवडणे, मतदान केंद्रात आवश्यक गोष्टींची पुर्तता करणे, मतदाराच्या बोटाला शाई लावणे, मतपत्रिका घडी करून टाकणे अशी सर्व प्रक्रिया म्हसळा शाळा नं.१ चे विद्यार्थ्यानी अनुभवली, जी प्रक्रीया वयाचे १८ व्या वर्षानंतर अनुभवाचे ती प्रक्रीया मुलाना आत्ताच अनुभवाला मिळाल्यामुळे सर्वच विद्यार्थी वेगळ्या आनंदात होते.
सौ शुभदा दातार नियोजन केले. सौ कल्पना पाटील व वंदना खोत उमेदवार निवड व त्यांना चिन्ह ठरवून दिले. सौ खेडेकर व मालुसरे सरांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती किशोरी बनकर , मेघना कदम, सुनील अंर्ञलेकर, सतीश शिगवण व अन्य पालक उपस्थित होते.
"शाळेतील विद्यार्थी मतदान रांगेत उभे रहाणे, मत टाकून आल्यावर शाईं लावलेले बोट उंचाऊन वर करून फोटो देणे, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणे असा सर्वच खऱ्या -खुऱ्या निवडणुकी प्रमाणे आनंद उपभोगत होते"
मेघना कदम , पालक.



Post a Comment