श्रीवर्धन एस टी आगारात निवृत्त कर्मचारी सोहळा संपन्न
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
प्रत्येकाच्या आयुष्यात निवृत्तीचा क्षण येत असतो .कोणतेही क्षेत्र असो व्यक्तीस निवृत्त व्हावेच लागते .व्यक्तीने आयुष्य जगतांना जोपालेली जीवन मूल्ये त्याच्या कडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन निर्माण करतात .व त्याचे कर्म त्याची ओळख निर्माण करतात असे प्रतिपादन रेश्मा गाडेकर यांनी केले .
श्रीवर्धन एस टी आगारात निवृत्त कर्मचारी कार्यक्रम प्रसंगी रेश्मा गाडेकर यांनी एस टी प्रशासनाला प्रामाणिक व संवेदनशील कर्मचाऱ्यांची अतोनात गरज असल्याचे सांगितले .एस टी ची सेवा ही सर्वसामान्य माणसासाठी हक्काची सेवा आहे .आपला नियमित अनेक लोकांशी संपर्क येतो .आपण केलेल्या कामांचा आपणांस आनंद मिळणे गरजेचे आहे .आज निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांनी निरंतर व अखंडित पणे जवळपास 32 वर्ष एस टी च्या माध्यमातून जनतेची सेवा बजावली आहे .त्यांचा सेवाभाव नवीन पिढीतील कर्मचाऱ्यांनी स्वीकारल्यास निश्चितच आगामी काळात त्याचा फायदा प्रवाशी जनता व एस टी या दोन्ही घटकांना होईल .असे रेश्मा गाडेकर यांनी सांगितले .सदर कार्यक्रम प्रसंगी निवृत्त कर्मचारी बाळकृष्ण पाटील व सुधा विचारे यांचा एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देत प्रदीप विचारे , संदीप गुरव , उदय हाटे यांनी मनोगत व्यक्त केली .निवृत्ती समारंभासाठी भरत घोडके , कैलास सातपुते , नारायण पवार ,शहाजी औटी , सोनाली सोमण व मोठया संख्येने एस टी कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मोरे यांनी केले .



Post a Comment