संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
बॅंक म्हटले की तक्रारी असा समज होत असतानाच म्हसळा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत डिमांड ड्राफ्टची सुविधा गेले दोन वर्ष नाही हा बँकींग सेवातील महत्वाचा विषय पुढे आलाआहे. पण म्हसळा करांचा प्रचंड संयम आसल्याने डिमांड ड्राफ्ट सेवे विषयी एकाही ग्राहकाची तक्रार नसल्याचे बॅंक प्रशासनाने सांगितले. बँकांच्या सेवां (Service)संबंधित तक्रारी जास्त असतात, त्यापाठोपाठ एटीएम आणि डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड आणि मोबाइल तसेच ऑनलाइन बँकिंगच्या संदर्भातील तक्रारींचा समावेश पेन्शन, नोटिशीविना ठोठावण्यात आलेले दंड, कर्जे या संदर्भातील विविध तक्रारीं असतात त्या सुध्दा केवळ तोंडी होत असतात असेही पुढे आले. म्हसळा शाखेत डिमांड ड्राफ्टची सुविधा गेले दोन वर्ष नाही हे अतिशय वाईट आसल्याचे , बॅंकेच्या सेवां मध्ये D/D हा घटक महत्वाचा असतो. परंतु या विषयी एकाही ग्राहकाने तक्रार का केली नाही हाही धक्कादायक व चर्चेचा विषय आहे.
"म्हसळा स्टेट बँकेच्या शाखेत डीमांड ड्राफ्ट काढण्यासाठी मी गेले असता कॉंऊटर वरील क्लॅर्क ने बँकेतून D/D काढला जात नाही असे उत्तर दिले."
-माहिला ग्राहक
"प्रत्यक्ष माहिती घेतली असता म्हसळा शाखेतून मागील काही काळापासून D/D दिले गेले नाहीत. त्याबाबत सखोल माहीती घेतली असता D/D प्रिंटींगचे मशीन तांत्रिक कारणाने बंद आहे. तात्काळ दूरुस्त करून सेवा पूर्ववत देण्यात येईल."
-गणेश बोधक, शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडीया, म्हसळा.
"म्हसळा स्टेट बँक म्हणजे No Service Station असे सूत्र झाले आहे. सातत्याने नेट नसणे, अपुऱ्या सुविधा, ए.टी.एम.,पास बुक प्रिंटर बाबत तक्रारींचे माहेर घर झाले आहे.मागील ३ते ४ वर्षांत वरीष्ठ कार्यालयाने नियत काळा साठी शाखा व्यवस्थापक न देता Short Term साठी प्रभारी शाखाधिकारी पाठवून वेळ मारून नेली हेच म्हसळा शाखेचे मुख्य दुखणे आहे."
-सुरेश जैन , व्यापारी.
नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग यासह कार्ड पेमेंट, एटीएम कार्डाचा विविध प्रकारे वापर कसा करावा याचे धडे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून खातेदारांना देणे गरजेचे आहे. बँकेतर्फे खातेदारांना विनामूल्य मार्गदर्शन करण्यात यावे , ‘टेक्निकल लर्निंग सेंटर’ प्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडीया ने अनेक ठिकाणी सेंटर सुरु केली आहेत . त्या पध्दतीने म्हसळ्यात सेंटर सुरु करावे.
-अशोक काते, सामाजिक नेते.


Post a Comment