प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर शेतीच्या कामांना वेग आला आहे. सर्वत्र भात लावणीची कामे जोरात सुरू आहेत. वेळास येथील आदर्श मराठी डिजिटल शाळेच्या विद्यार्थ्यांनीही शेतात उतरून या भात लावणीचा अनुभव घेतला.
शिक्षकांनी मुलांना भात शेतीविषयीची संपूर्ण माहिती समजावून सांगितली. भातशेती करताना कोणकोणती कामे केली जातात? नांगरणी, पेरणी, बेनणी, कापणी, उफाळणी व झोडपणी या सर्व कामांविषयी सविस्तर माहिती दिली. शेतीचे औजारे कशी हाताळावी, औजारांची प्रत्यक्ष ओळख करून त्यांचे वापर समजावून सांगितले. तसेच अन्नाचे महत्त्व आणि त्यामागची मेहनत विद्यार्थ्यांना पटवून दिली. मुले व शिक्षकांनी भात लावणीचा आनंद घेतला. भात लावणीचा अनुभव घेतल्यानंतर चिखलात खेळण्याचा मनसोक्त आनंदही मुलांनी लुटला.
शाळेतील शिक्षक वृंद सौ. लिना बोरकर मॅडम, रामेश्वर जाधव सर आणि विश्वनाथ नागे गुरुजी यांनी हा अनोखा उपक्रम यशस्वी राबवून एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांच्या गाठीशी बांधून दिला आहे.



Post a Comment