म्हसळा प्रतिनिधी : संजय खांबेटे
आषाढातील शुक्ल पक्षातील पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना आपल्या गुरची पूजा करीत असत त्याच धर्तीवर म्हसळान्यू इंग्लीश स्कुल मध्ये गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी
प्रा बाळासाहेब माळी, मंगेश कदम, पाटील , पाडियार , दीपक सूर्यवंशी, गांजरे सर खोकले , गायकवाड , हिरवे ,जाधव , गोसावी , शिर्के बोराटे , आमले सर, हांगे शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते. यावेळी सुर्यवंशी, गायकवाड सर यानी गुरु व शिक्षाचे नाते कसे असते व असावे हे सांगितले.कु मोहिनी जाधव, सबा शहा, समरिन शहा, कविता देऊळगावकर, मनीषा राठोड, धनश्री मेंदडकर, वैष्णव म्हात्रे, मल्लिका सिंग, सुहानी चव्हाण इ, विध्यार्थी -विद्यार्थीनीनी भाषणे केली व शिक्षकाना श्रीफळ व फुले देऊन पूजन केले.


Post a Comment