म्हसळा शहरातील बेकरी / भट्टी मधून आलेल्या पावामध्ये मृत पावलेली माशी दिसत आहे.
म्हसळ्यात पाव मध्ये आढळ्ली मेलेली माशी : आरोग्य, अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात
निकेश कोकचा : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरातील बेकरी/ भट्टीमधून बाजारात येणाऱ्या पावामध्ये मेलेली माशी आढळल्याने खळबळ उडाली असून आरोग्य,अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे म्हसळा शहरासहित तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
म्हसळा शहरात चार ते पाच मैद्यापासून पाव व इतर खादयपदार्थ बनवणाऱ्या बेकरी / भट्टी आहेत. या पैकी एक- दोन भट्टी वगळता बाकीच्या भट्टींमध्ये नियमित दुर्गंधी, माशा, सडलेले पाव, चिखल,किडे व ढिंगळे निदर्शनास येतात. शहरातील या भट्टीमध्ये सांडपाण्याची व्यवस्या देखील नाही आहे. अशा या भट्टी मधुन पाव, बिस्कीट, बटर, ब्रेड, नान, केक बनवले जातात व हे पदार्थ विक्रीसाठी बाजारामध्ये पाठवले जातात. मात्र या भट्टी मधुन बनवलेल्या खादय पदार्थांमध्ये मेलेल्या माशी, मुंग्या व ढिंगळ्यांचे वाढीव प्रमाण आढळत आहे.पाव व बटर फुगलेला दिसण्यासाठी यामध्ये इस्ट नावाच्या पदार्थाचे मोठया प्रमाणात वापर होत आहे, हा वापर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक असुन आरोग्य विभाग ,अन्न व औषध प्रशासन या सर्व गोष्ठीकडे दुर्लक्षीत करूण नागरीकांचे आरोग्य धोक्यात घालत आहे.आरोग्य विभागाने तातडीने या सर्व भट्टींची आरोग्य तपासणी करूण दोषी भट्टी मालकांवर कारवाई करण्याची मागणी शहरातून पुढे येत आहे.

Post a Comment