म्हसळ्यात विजेच्या लंपडावाने नागरिक हैराण.


लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा नसल्याने विज कर्मचाऱ्यांची कमतरता .
संजय खांबेटे : म्हसळा  प्रतिनिधी
विजसेवा म्हणजे अत्यावश्यक असून म्हसळा शहरांत व ग्रामिण भागात सतत विजपुरवठा खंडीत होत आसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यात सुमारे १९ हजार २५६ ग्राहक आहेत यामध्ये घरगुती, व्यापारी, औद्योगिक या सर्व ध्दतीचे ग्राहक आहेत. मे महीन्यांत प्री मान्सून मेंटेनंस साठी सातत्याने विज पुरवठा खंडीत होत असे, तर आता अति पाऊस , वादळी वारे व विजांचा कडकडाट मुळे विज खंडीत होण्याचे प्रकार सतत होत आहेत.वीज वितरण कंपनीने ग्राहकाना गतीमान सेवा मिळावी म्हणून ग्राहक संख्या व तालुक्याचे भौगोलीक रचने प्रमाणे म्हसळा उपविभागात म्हसळा शहर, म्हसळा ग्रामीण, मेंदडी, खामगाव, आंबेत ह्या पाच शाखा कार्यालयांची निर्मीती केली आहे. प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये 50 टक्क्यापेक्षा अधिक कर्मचारी पदे रिक्त आहेत. प्रशासकीय अगर विनंती बदलीने गेलेले कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि यापूर्वीची रिक्त पदे यामुळे आज ३३ कर्मचाऱ्यांची कमतरता तालुक्यात निर्माण झाली आहे. याचा फटका कर्मचाऱ्यांवर अधिक कामाचा ताण व भार पडल्यामुळे शहरी भागातील दुरुस्तीला प्राधान्यक्रम दिला जातो त्याचा ग्रामिण भागावर ताण पडल्याने ग्रामिण भागातील विद्युत पुरवठा जास्त कालावधी साठी ( २ते ५ दिवस )बंद रहातो. 
मेंदडी,खामगाव, आंबेत, म्हसळा ग्रामीण या चारही विभागातील सेक्शन इंजिनीअर मागील वर्षी जुन महीन्यामध्ये बदली करुन गेले आहेत. म्हसळा तालुका हा डोंगराळ तालुका म्हणुन ओळखला जातो त्यातच या चारही विभागातील सेक्शन ईंजिनियर यांनी बदली करुन घेतली आहे त्यामुळे वारंवार मिटरच्या तक्ररी बाबत अथवा लोकांची नविन मिटर लावलेपासुन येणा-या तक्रारी जास्त प्रमाणात आहेत मात्र या तक्रारी निवारणासाठी या चारही विभागात कोणतेही सेक्शन ईंजिनियर नसल्याने नागरीकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यांत वि. वितरण कंपनीचे कर्मचारी यावेत यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आसल्याचे नागरीकांचे मत आहे.

प्रत्येक विभागासाठी अकरा पदे मंजुर असताना
१) मेंदडी विभागात सेक्शम इंजिनियरसह 8 पदे रिक्त
२) खामगान विभागात देखील सेक्शन इंजिनियरसह 8 पदे रिक्त
३) आंबेत विभागात सेक्शन इंजिनियर सह 5 पदे रिक्त
४) म्हसळा ग्रामीण विभागात सेक्ऩ इंजिनियर सह 7 पदे रिक्त
५) म्हसळा शहर विभागात एक असी.इंजिनियर सह 5 पदे रिक्त

"सुरुवातीला पावसाळ्यात तांत्रिक कारणामुळे विजपृरवठा बंद पडतो कारण म्हसळा तालुका हा डोंगराळ तालुका असल्यामुळे व बहुतांश लाईन फॉरेस्ट मधुन जात असल्याने थोडा वेळ लागतो. आमचा सर्व स्टाफ विशेष प्रयत्न करत आहे. आम्ही सातत्याने रिक्त पदांच्या पुर्ततेकरीता वरीष्ठ कार्यालयाकडे पत्र पाठवत असतो .
यादव ईंगळे , कार्यकारी अभियंता, महावितरण म्हसळा उपविभाग.

"म्हसळा तालुक्यांत , गळती व थकीत बिले यांचे प्रमाण अतीशय कमी आसल्याने अशा भागाना वरीष्ठ कार्यालयाने प्राधान्याने कर्मचारी देणे गरजेचे आहे त्या पध्दतीने राज्याकडे पाठपुरावा करणार"
महादेव पाटील., माजी सभापती पं.स. म्हसळा.

"स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समीती व लोकप्रतीनिधींच्या आढावा बैठकीतून आम्ही म.रा. वि.वि. कंपनीच्या अनेक समस्या सातत्याने मांडल्या आहेत. लोकप्रतिनिधींकडून अभ्यासू पाठपुरावा होतच नसल्याचे समजते. जिल्हयांतील अन्य तालुक्यांत कर्मचाऱ्यांची संख्या म्हसळा तालुक्याचे पेक्षा तुलनेने जास्त आहे"
उस्मानभाई पटेल. सामाजिक कार्यकर्ता

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा