खासदार सुनील तटकरे यांचा म्हसळा राष्ट्रवादी तर्फे शनिवारी फळसप येथे जाहीर सत्कार



आंबेत-गणेश म्हाप्रळकर
रायगड लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांचा  म्हसळा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे फळसप येथे शनिवार दि. ६ जुलै रोजी जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या जाहीर सत्कार सभारंभासाठी जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते,नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांचा पराभव करून रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार तटकरे यांची प्रथमच आंबेत खाडीपट्ट्यात आगमण होत असून ते शिवसेनेचे नाविद अंतुले यांच्या बद्दल काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा सत्कार सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत  समारंभ होणार असल्याचे रा.कॉ. प.महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री भास्कर दाजी यांनी सांगितलं. म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीपट्ट्यातून सुनील तटकरे यांना या वेळी  जनतेने भरघोस मतदान केल्यामुळे खा.तटकरे फळसप येथील जाहीर सभेत उपस्थित नागरिकांच्या समस्यांचे देखील निवारण  करून त्यांच्याशी थेट संपर्क साधणार असल्याचे दाजी विचारे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा