श्रीवर्धनच्या एसटी बसची विश्वासू संघटना 'कागदावरच' : नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त


श्रीवर्धन : भारत चोगले
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये एस . टी . बसची विश्वासू नियुक्त संघटना फक्त कागदावरच असल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील खेड्यापाड्यातील प्रवासी, नागरिक व पर्यटकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याकडे श्रीवर्धन एसटी बसच्या विश्वासू संघटनेकडून कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे, असे श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासी वर्गाकडून बोलले जात आहे. साधारपणे दोन ते तीन वर्षापुर्वी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांसाठी व राज्यभरातील येणा-या पर्यटकांसाठी एसटी बस स्थानकामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये . यासाठी ही श्रीवर्धन तालुक्यातील एसटीबस विश्वासू संघटनाची नियुक्ती करण्यात आलेली आहे . या संघटनेमध्ये आगार व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली साधारणपणे आठ ते दहा सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नामंवतानांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. काही प्रवासी तसेच पर्यटक यांना भेडसावत असणा-या समस्या किंवा एखाद्या सूचना थेट मांडता येत नाहीत . त्यासाठी श्रीवर्धनमध्ये तीन वर्षापूर्वी ही संघटना स्थापन केली आहे . या संघटनेची दर महिन्याला सभा घेणे क्रमप्राप्त आहे . जेणे करून बसस्थानकामध्ये निर्माण होणा-या समस्या , एसटी बससाठी चांगले धोरण , मागणी , छोट्यामोठ्या अनेक प्रकारच्या सूचना या सभेमध्ये मांडल्या जाव्यात व त्याचे योग्य प्रकारे निवारण करण्यात यावे हे मुख्य उद्देश आहेत . परंतु नव्याचे नव दिवस याप्रमाणे सुरूवातीला काही महिने ही सभा घेण्यात आली . मात्र आज ती फक्त कागदापुरती आहे का असा सवाल श्रीवर्धन मधील नागरिकांकडून केला जात आहे . जर का विश्वासू संघटनामध्ये काम करत असणारे सदस्य हे काम करण्याकरिता वेळ देत येत नसतील तर श्रीवर्धन बसस्थानक आगार प्रमुखांनी नव्याने सदस्यांची नियुक्ती करावी. अथवा या संघटनेचे अध्यक्षच सभा घेत नसतील तर याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासीवर्गामधून जोर धरत आहे. जेणे करून प्रवासी वर्गाला भेडसावत असलेल्या समस्यांबाबत विचार मांडले जावून त्याबाबत निर्णय घेतला जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा