फळसप गावात झालेला सत्कार माझा आत्मविश्वास वाढविणारा सत्कार खासदार सुनिल तटकरे यांनी केले म्हसळाकरांचे कौतुक
म्हसळा -वार्ताहर
रायगडच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकुन मला प्रचंड मताधिक्य देत खासदार म्हणुन जनतेची सेवा करण्यासाठी दिल्लीच्या संसदेत पाठवले त्या मध्ये श्रीवर्धन मतदार संघाचा वाटा मोठा आहे त्याचे उत्तरदायित्व म्हणुन म्हसळा तालुक्यातील फळसप गावात माझा सत्कार करण्यात आला हा सत्कार माझा आत्मविश्वास वाढविणारा असल्याचा व आनंददायी असल्याचे कौतुकास्पद उदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस खासदार सुनिल तटकरे यांनी आयोजित सत्कार कार्यक्रमात जाहीरपणे व्यक्त केले.पक्षाचे नेते प्रदेश उपाध्यक्ष भास्कर दाजी विचारे यांचे नेतृत्व व अध्यक्षतेखाली फळसप येथील सोमजाई, जाकमाता मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांचा शाल,श्रीफळ,शिवपुतला आणि तलवार भेट देऊन करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे,जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर, बापु विचारे,तालुका अध्यक्ष समीर बनकर, अल्पसंख्याक अध्यक्ष नाझीम हसवारे,दर्शन विचारे,सुभाष केकाने,सभापती छाया म्हात्रे, उप सभापती संदीप चाचले,जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे,सदस्या धनश्री पाटील,वैशाली सावंत,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,माजी सभापती उज्वला सावंत,अनिता खडस,मधुकर गायकर,अंकुश खडस,व्यंकटेश सावंत,जयवंत सावंत,मुंबई अध्यक्ष महेश शिर्के, जयंत चिबडे,तालुका
कुणबी समाज नेते महादेव पाटील महाडचे देशमुख,फारूक भाई,उद्योजक मेडेकर,सरपंच सचिन विचारे आदि मान्यवर मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.सत्काराला अधिकपणे उत्तर देताना खासदार सुनिल तटकरे यांनी मी खासदार व्होवे म्हणुन अनेकांनी देवाकडे नवस,प्रार्थना केली त्याचे उत्तरदायित्व म्हणुन पुढील पाच वर्षाचे कार्यकाळात सर्वधर्म,सर्वभाषिक जनतेला सोबतीला घेत संसदेच्या माध्यमातून अपेक्षित काम करेल असे आश्वाशीत करताना मी पहिल्यांदा लोकसभेच्या संसदेत पाऊल टाकले तेव्हा मी माझी ओळख करून देताना मी येथे आलो आहे ते महाराष्ट्र राज्याच्या भूमीतून विशेषतःशूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातुन आलो आहे अन्य राजांच्या प्रमाणे शिवाजी महाराजां सारखे दुसरे दैवत नाही हे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करताना सांगितले आहे.तुम्ही मला निवडुन देत दिल्लीला पाठवलं आता पुढील सेवा देण्याचे काम माझे आहे.त्या साठी ज्यांनी ज्यांनी मला हे यश मिळवून दिले ते ह्या सत्काररुपी दिलेल्या पुष्पहाराचे मानकरी आहेत असे गौरवद्गार काढताना लोकांच्या अपेक्षा आता खासदारांकडुन वाढलेल्या आहेत त्या अपेक्षा पुर्ण करताना पुढील पाच वर्षाच्या कालावधीतच कर्तबगारीने जे काम होईल ते आपणांस पहायला मिळेल आपण दिलेली उर्जा घेऊन शिक्षण,आरोग्य,दर्जेदार रस्ते,रोजगार,उद्योग आदी कामावर भर देणार असल्याचे सांगताना मतदारसंघात व्यक्तिगत लाभार्थ्यांची यादी तयार करून शासकीय सर्व त्या योजना प्रत्येकाला मिळाव्यात या करिता माझे प्रयत्न राहतील आणि त्याचा मी तालुका स्तरावर पदाधिकाऱ्यांंच्या मार्फत पाठपुरावा करेल.रायगड मध्ये मेडिकल कॉलेज निर्माण होण्यासाठी पाठपुरावा करणारच परंतु औद्योगिक व पर्यटन विकास व्हॉवा यासाठी रेवसरेड्डी सागरी मार्ग होण्यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.त्याला अधिक गती मिळावी म्हणुन पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेबांसोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले.देशातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे ती रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळविण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.आपल्याला सर्व परिसरात असंख्य गोष्टी करायच्या आहेत.शासना मार्फत महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत,किमान रोजगार योजना,शुष्म,मध्यम,लघु उद्योग, अल्पसंख्याक समाजा करिता योजना याचाही पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.नुकताच देशाचा अर्थसंकल्प अधिवेशनात मांडण्यात आला आहे यावरही मी येत्या सोमवारी बोलणार असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी आवर्जुन उल्लेख केला.शेवटी खासदार सुनिल तटकरे यांनी सर्वांंचे
जाहीर आभार व्यक्त करताना काँग्रेस, शेकाप आघाडी पक्षाचे सहकारी आणि ज्ञात, अज्ञात असंख्य शक्तीसह मला खासदार होण्याची मदत झाली आहे त्यात श्रीवर्धन मतदारसंघाचा वाटा मोठा आहे तब्बल 38 हजाराचे मताधिक्य हा ह्या मतदारसंघात झालेला इतिहास आहे येथे अनेक वर्षापूर्वी बॅ. अंतुले साहेबांना 31 हजाराची आघाडी घेता आली होती याची आठवण खा. तटकरे यांनी करून दिली.मला म्हसळेकरांनी फळसप गावी सत्कार रुपी घातलेली मायेची शाल,गुलाब पुष्पहार आणि शौर्याचे प्रतीक म्हणून दिलेली तलवार मी जनतेला अभिप्रेत असलेल्या कामासाठी सदैव प्रेरीत राहील असे मनोगता मधुन व्यक्त केले. या कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे यांना वाढदिवसच्या आगाऊ शुभेच्छा देण्यासाठी संसदभवनाचा चित्र रेखाटलेला केक कापून साजरा करण्यात आला. वाजत गाजत आणि तुतारीच्या जयघोषात खासदार सुनिल तटकरे यांचा म्हसळा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले.कार्यक्रमात कार्यक्रमाचे मुख्य आयोजक दाजी विचारे यांनी तालुक्यातील जनतेने काम करणाऱ्या नेत्याच्या अर्थात सुनिल तटकरे यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहिले पाहिजे. त्यांच्या माध्यमातून सांगु ते काम गाववाडीत विकासाचे माध्यमातून झाला आहे आणि अधिकपणे होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हा अध्यक्ष प्रमोद गोसाळकर,तालुका अध्यक्ष समीर बनकर,काँग्रेसचे महादेव पाटील,मुंबई निवासी ता.अध्यक्ष महेश शिर्के,पक्ष नेते अंकुश खडस यांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.


Post a Comment