म्हसळा प्रेस क्लबची धुरा युवा पत्रकारांच्या हाती : तालुक्यातून होत आहे कौतुक.


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
रायगड प्रेस क्लब संलग्नित म्हसळा प्रेस क्लबची धुरा युवा पत्रकारांच्या हाती आल्याने तालुक्यातून सर्व पत्रकारांचे कौतुक होत आहे.म्हसळा सार्वजनिक वाचनालयात झालेल्या तालुका प्रेस क्लबच्या सभेत अध्यक्षपदी शशिकांत उर्फ बाबू शिर्के,उपाध्यक्षपदी अंकुश गाणेकर तर सचिवपदी महेश पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,अशोक काते, उदय कळस,हेमंत पयेर,सुशील यादव,श्रीकांत बिरवाडकर आदी पत्रकार उपस्थित होते.घोणसे घाट पर्यायी मार्ग,ग्रामीण रुग्णालय इमारतीसह अन्य सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टीने जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,अशोक काते , उदय कळस यांनी जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचवला त्याप्रमाणे युवा पत्रकारांनी तालुक्याचा रचनात्मक विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी,राजकीय पक्ष व प्रशासनासोबत प्रयत्न करावे व जनतेशी बांधीलकी ठेवावी अशा तालुक्यातून प्रतिक्रिया येत आहेत.

"पत्रकारीतेत त्याग करणारी व आपल्या लेखणीतून पीडीत जनतेच्या समस्या सोडविणाऱ्या जेष्ठ व अनुभवी मंडळीनी युवा पत्रकारांकडे दिलेले नेतृत्व आर्दश आहे. अध्यक्ष बाबू शिर्के व सर्व टिमला शुभेच्छा"
-महादेव पाटील माजी सभापती, म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा