Mhasla Live इम्पॅक्ट : म्हसळा पोस्ट ऑफीस एकाच वेळी दोनही समस्या सुटल्या


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा पोस्ट ऑफीस इमारतीची दयनीय स्थिती मोजते अखेरच्या घटका व कार्यालयांतील बहुतांश कॉप्युटर बंद पडल्याने देण्यात येणाऱ्या टपाल सेवा पूर्णपणे बंद पडल्या आहेत. या बातमीने जिल्हा कार्यालयाने तात्काळ दखल घेऊन प्रथम सेवा व येत्या ३ते ४ माहिन्यात नवीन भाड्याचे जागेत स्थलांतर असे सकारात्मक मुद्दे पुढे आले. इमारतीचे वृत्त , नागरी व्यापारी वापर असलेली घोकादायक इमारतीचे फोटो पहाता, जिल्हाधिकारी रायगड यांच्या दुर्घटना रोखण्यासाठी धोकादायक इमारतीच्या पहाणीसाठी म्हसळ्याचे तहसीलदार शरद गोसावी यानी पोस्ट ऑफीसच्या इमारतीची तात्काळ पहाणी करुन नागरी व व्यापारी वापराची जागा धोकादायक असल्याचे सांगून पर्यायी जागेत स्थलांतरीत करण्याचे आदेश संबंधीताना दिले व बंद असलेल्या सेवा सुरु झाल्याबाबत खात्री करुन घेतली. म्हसळा नगरपंचायतीच्या इंजीनीअर च्या माध्यमातून सुद्धा सर्वेक्षण झाले आसल्याचे नायब तहसीलदार के.टी. भिंगारे यानी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

"इमारत नागरी सुविधांसाठी वापरण्यास आयोग्य आहे. छताचे प्लॅस्टर सुटले असून शिगा सडून बाहेर पडल्या आहेत . अपघात अगर दुर्घटना घडल्यास पोस्ट मास्तर ( कार्यालय प्रमुख) कारवाई होऊ शकते"
शरद गोसावी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा