श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
जून महिन्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली .त्या पुर्वी मच्छीमार बांधवांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी लावलेल्या जाळ्यात समुद्री कासव अडकले .समुद्राला आलेल्या भरती मुळे जाळे किनाऱ्यावर फेकले गेले सदरच्या जाळ्यात अडकून कासव किनाऱ्याच्या जवळ आले .जाळे भेदून बाहेर पडणे कासवाला शक्य झाले नाही .बाहेर पडण्याचा प्रयत्नात असताना कासव जाळ्यात पाठीवर पडले .त्यामुळे जाळ्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे कासवाला शक्य नव्हते अशा जाळ्यात गुंतलेल्या अवस्थेत कासव श्रीवर्धन मधील तरुणांना आढळले .महेश कुंभार व चिन्मय मेहता हे तरुण सकाळी समुद्रावर भ्रमंती साठी गेले असता त्यांना जाळ्यात अडकलेले कासव निदर्शनांस आले . त्यानी प्राणी मित्र शैलेश ठाकूर ,सिद्धेश गुरव ,संग्राम पवार व अमर गुरव यांना सदरची बाब कळवली .जाळयात अडकलेल्या कासवाला व्यवस्थित पणे बाहेर काढण्याचे काम प्राणी मित्रांनी योग्य पद्धतीने पार पाडले .कासवाला पुर्ववत समुद्रात सोडण्यात आले .
मी अनेक दिवसा पासून सर्प मित्र म्हणून काम करत आहे .साप , धामण ,नाग याच्या सोबत कासव , अजगर व अन्य वन्य प्राण्यांना आम्ही अनेकदा संकटातून मुक्त केले आहे .वन्यजीव संवर्धन ही काळाची गरज आहे .आम्हांला या कामातून मनस्वी आनंद मिळतो.
-शैलेश ठाकूर (सर्प मित्र श्रीवर्धन )

Post a Comment