संजय खांबेटे :म्हसळा प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या सौजन्याने तालुकास्तरावर "शाश्वत स्वच्छ आराखडा " या एका दिवशीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दिं . ४ जुलै रोजी सकाळी ११ वा . सार्वजनिक वाचनालय , म्हसळा येथे आयोजित केले आहे. या कार्यशाळेला सरपंच , ग्रामसेवक व स्वच्छताग्रही याना आमंत्रित केले आसल्याचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनिल गायकवाड यानी कळविले आहे.
कार्यशाळेचे उद्दीष्ट
१)स्वच्छता, आरोग्यदायी सवयी व हागणदारी मुक्तीव्दारे ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवून आणणे.
२)ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या व्याप्तीची गती वाढवून 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारतचे स्वप्न साकार करणे.
३)शाश्वत स्वच्छतेच्या साधनांचा प्रसार करणाया पंचायतराज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जागृती व आरोग्य शिक्षण याव्दारे प्रेरित करणे.
४)पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.
५)ग्रामीण भागात सार्वत्रिक स्वच्छता राखण्यासाठी लोकांचे व्यवस्थापन असलेल्या आणि घनकचरा व सांडपाण्याच्या विल्हेवाटीला प्राधान्य देणाया पर्यावरणास अनुकूल स्वच्छतेच्या पध्दती विकसित करणे.
याच बरोबरीने तालुका हागणदारी मुक्त झाला असला, तरी गाव पातळीवर वैयक्तिक स्वच्छतेचे मूल्य रुजविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शाश्वत स्वच्छता आराखडा निर्मितीसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत म्हसळा तालुक्यात करण्यात आले आहे.

Post a Comment