खरसई पंचक्रोशीतील जनता धरण पूर्ण होण्यासाठी ३९ वर्षे प्रतिक्षेत
संजय खांबेटे : म्हसळा वार्ताहर
रत्नागिरीत झालेल्या तुफान पावसामुळे चिपळूण तालुक्यातले तिवरे धरण मंगळवारी रात्री उशीरा फुटले आणि हाहाकार उडाला मृतांची संख्या २० च्या घरात गेली.चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या दुर्घटनेतील संबंधित दोषी अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तिवरे येथील दुर्घटनेच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील धरणे, पाझर तलावांची पहाणी, चौकशी व अहवाल जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यानी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार याना दिले त्यामुळे म्हसळा तहसीलदार शरद गोसावी व लघु पाटबंधारे (स्था.स्तर) अभियंता रमेश फेरवाणी यानी पहाणी केली. धरणापासून कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला.
"खरसई धरणाची समक्ष पहाणी करता त्यामध्ये पाणी पातळी ११६.६० मी, पाणीसाठा ८६४.२०स.घ.मी. आहे धरणाला कोणताही धोका नाही."-रमेश फेरवाणी, उप-विभागीय जल संधारण अधिकारी, माणगांव.


Post a Comment