सुरेश जैन व रविंद्र दळवी यांच्या घरी चोरट्यांनी कपाट फोडल्याचे दिसत आहे ( छाया - निकेश कोकचा )
म्हसळा शहरात पोलिस ठाण्यामागील दोन घरांमध्ये दरोडा : देवाच्या भांडयांसहीत सात लाखाचे ऐवज व रोकड लंपास :नागरीकांमध्ये घबराट
म्हसळा ( निकेश कोकचा )
म्हसळा शहरातील पोलिस ठाण्यामागे हाकेच्या अंतरावरील दोन बंद घरामध्ये अज्ञात चोरटयांनी दरोडा टाकून तब्बल ७ लाख रुपयांचे ऐवज व रोखड लंपास केल्याची घटना ७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
म्हसळा पोलिस ठाण्याच्या मागे असणाऱ्या साळीवाडा येथिल कपडा व्यापारी सुरेश मिश्रीमल जैन व बॉन्ड रायटर रविंद्र दळवी यांच्या राहत्या घरात चोरीची घटना घडली आहे. सुरेश जैन हे ४ जुलै रोजी सहकुटूंब आपल्या भाचीच्या लग्णासाठी बेंगलोर येथे गेले असल्या कारणे त्यांचा घर बंद आहे. तर रविंद्र दळवी यांच्या घरात ते येऊन जाऊन असल्याकारणे ६ जुलै रोजी बंद होते.जैन हे दुसऱ्या राज्यात गेले असल्याचा तर दळवी हे घरी नसल्याचा फायदा घेत चोरांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करूण चोरी केली. चोरट्यांनी जैन यांच्या घरातून बांगडी, मंगळसुत्र, छोटा मंगळसुत्र, ब्रेस्लेट, चैन,वाटी, कानातले जोड असे १८ तोळे सोन्याचे ऐवज व रोख रक्कम २० हजार अशा सामानावर हात साफ केला.दळवी यांच्या घरातील ३० हजार रकमेचे देवाचे चांदीचे भांडी चोरून न्हेले.
म्हसळा शहरात पोलिस ठाणे परिसरात एकाच रात्री दोन घरांत चोरीची घटना घडल्यामुळे नागरीकांमध्ये घबराट पसरली असून या चोरट्यांना लवकर जेलबंद करण्याची मागणी पुढे येत आहे. पोलिसांकडून चोरांचा शोध घेण्यासाठी अलिबाग येथून ठसे तज्ञ व श्वान पथक यांना बोलवण्यात आले आहे. कांतीलाल जैन व रविंद्र दळवी यांच्या फिर्यादीवरूण अज्ञात चोरट्यां विरुदध् म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी बाबूराव पवार ,प्र. पोलिस निरिक्षक बि.एस. पवार, उप पोलिस निरिक्षक दिपक धूस यांनी भेट दिली.
म्हसळा शहरातील नागरीकांनी घराबाहेर जाताना सावधता बाळगत मौल्यवावान वस्तू घरामध्ये ठेवू नये. चोरट्यांवर आळा घालण्यासाठी लवकरच म्हसळा नगरपंचायत प्रशासना सोबत बैठक घेऊन शहरात ५० ते ६० सि.सि.टिव्ही कॅमेरे लावण्यात येतील.-बापुराव पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीवर्धन

Post a Comment