म्हसळा - वार्ताहर
म्हसळा श्रीवर्धन तालुक्यासारख्या डोंगर ग्रामीण भागात आगरी समाजाची मोठया लोकवस्तीची 18 गावे आहेत.या समाजाचा शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी कालांतराने बांधकाम आदी व्यवसायात प्रगत होत गेला.संगणक युगात आगरी समाजातील तरुण तरुणी शिक्षित होऊन आज मोठ मोठया शहरात कला, क्रीडा, नोकरी, व्यवसाय, उद्योजक म्हणून हातपाय पसरून गाव, तालुका आणि समाजाचे नाव लौकिक करू लागला आहे.गेल्या चार वर्षांपासून म्हसळा श्रीवर्धन तालुक्यातील 18 गाव आगरी समाजातील स्थानिक व मुंबई निवासी तरुण समाजाचे सामाजिक,शैक्षणिक उन्नतीसाठी एकत्रितपणे येत युवा संघाची स्थापना केली आहे. संघाचे आर्थिक उन्नतीसाठी युवा संघाने दिनांक 7 जुलै 2019 रोजी मुंबई शहरातील परेल येथील दामोदर नाट्य गृहात "सतीचा शाप"हा गणेश हिर्लेकर लिखित दोन अंकी नाटक सादर करणार आहेत. विशेष म्हणजे या नाटकात 18 गाव आगरी समाजातील कलाकार आपली कला सादर करणार आहेत.नाटकाचे दिग्दर्शन शांताराम नाक्ती,सहदिग्दर्शन दिपक धुमाळ, संगीत सुनिल बिराडी, गितबद्ध विनय पांडव, पार्श्वगायक पांडुरंग बुधे,प्रकाश योजना रामचंद्र पयेर,डिझाईन उपेंद्र पाटील आणि आऊल फोटोग्राफी करणार असल्याचे आगरी समाजाचे नेते महादेव पाटील यांनी माहिती देताना सांगितले.


Post a Comment