मेंदडीमध्ये डेंग्यूची लागण नाही : योग्य समन्वय व जन जागृती नसल्याने रुग्णांचा कल खाजगी सेवेकडे



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी


तालुक्यातील मेंदडी ग्रामपंचायत हद्दीतील मेंदडी कोंड व परिसरातील काही रुग्णाना थंडी,ताप,सर्दी,उलटी,अंगदुखी होऊ लागल्याने तपासण्या केल्या असता रक्तांतील फ्लेटरेटस् कमी आसल्याचे आढळले व रुग्ण डेंग्यू सदश्य रुग्ण आसल्याची मोठया प्रमाणांत प्रसिद्धी झाली , तालुक्यांतील विविध खाजगी लॅबमध्ये सुमारे ३०ते ४० रुग्णांच्या तपासण्या झाल्या त्यामध्ये १ रुग्ण डेंग्यू पॉझीटीव्ह असल्याचे समजते. डेंगू, मलेरिया, अनुवांशिक आजार आणि केमोथेरपीमुळे प्लेटलेट्सची संख्या कमी होते. सध्या डेंगू, मलेरिया, चिकुन गुन्या सारख्या रोगांनी थैमान घातल्यामुळेच प्लेटलेट्स तपासण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करण्यास सांगतात. ज्या आधारे पुढील उपचार करता येऊ शकतात.असे खाजगी व्यवसायीकांचे म्हणणे आहे .

खालील गोष्टींच्या सेवनाने प्लेटलेटचे प्रमाण वाढते.
लिंबूमध्ये व्हिट्यामिन ‘सी’ चे प्रमाण जास्त त्यामुळे प्लेटलेट वाढण्यास मदत होते.भोपळ्याचे पोषक तत्व प्रोटीन निर्माण करण्यासाठी महत्वाचे असते.पपई खाल्याने कमी झालेल्या प्लेटलेट वाढतात.आवळ्यामध्ये व्हिट्यामिन सी चे प्रमाण भरपूर असते तो खावा, व्हीटग्रास  गहूचे पात प्लेटलेट्सचे प्रमाण वाढवण्यासाठी चांगली मदत करते.

प्लेटलेट्स कमी झाल्याचे निदान आल्यास पुढील गोष्टी टाळाव्या
१) लसून खाणे टाळावे
२) अधिक श्रमाचे व्यायाम आणि दगदग होईल अशी कामे करू नयेत
3) दात घासताना हिरड्यांना ब्रश लागणार नाही याची काळजी घ्यावी.


"मेंदडी कोंड येथील एक रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे, खाजगी प्रयोगशाळेतील अहवाला नुसार N.S.1 अढळला आहे. डेंग्यू हा उपचाराने पूर्ण बरा होतो. डेंग्यूमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता एक टक्क्यांहून कमी रुग्णांमध्ये असते आणि योग्य निदान व उपचार केले तर एकही रुग्णांचा मृत्यू होणार नाही.पुढील दक्षतेसाठी त्या रुग्णाचे रक्त जल नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. मेंदडी प्रा.आ.केंद्रात प्लेटरेट बाबत निदान व उपचार केला जातो, आवश्यक सर्व औषधे व साधने उपलब्ध आहेत."-डॉ. प्राची सिन्हा, वैयकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र, मेंदडी

"आठवडयातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.पाणी साठवलेल्‍या भांडयाना योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे.घराभोवतालची जागा स्‍वच्‍छ ठेवावी या बाबत सर्तकता व काळजी घेण्याबाबत तालुक्या तील सर्व ग्रामपंचायतीना कळविले आहे."
-डी.पी. हिंदोळा, आरोग्य पर्यवेक्षक. पं.स. म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा