म्हसळा प्रतिनिधी
श्रीवर्धन मतदार संघात मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझा फक्त 77 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा मीच दावा करणार असून पुन्हा निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना दिली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तुकाराम सुर्वे यांचा पराभव झाल्यानंतर श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेला मरगळ आली होती पण बाळा साहेबांच्या आशीर्वादाने मला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली.आणी मी मतदार संघात पुन्हा नवचैतन्य आणले.पुन्हा शिवसेना उभारीला आणली.यांचे फळ मला 2014 ची उमेदवारी शिवसेनेकडून मिळाली शिवसैनिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला भरगोस मते दिली पण माझा थोड्या मतांनी पराभव झाला.तो पराभव सर्व शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला. हा पराभव होऊन सुद्धा मी माझे शिवसेना वाढीसाठी काम करीत राहिलो. शिवसैनिकांचा अजून माझ्यावर पूर्णपणे ठाम विश्वास आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत काहीही झाले तरी उमेदवार मीच असणार असे ठामपणे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.
तसेच काहीजण श्रीवर्धन मतदार संघावर दावा करून मलाच उमेदवारी मिळणार असे सांगत आहेत.त्यांना एवढच सांगणे आहे कि श्रीवर्धन मतदार संघात रवी मुंढे आणी शिवसेना अजून संपली नाही असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांचे नाव न घेता रवी मुंढे यांनी लगावला.

Post a Comment