म्हसळयांत पाच दिवस धुँवाधार पावसानंतर आज झाले सुर्यदर्शन


संजय खांबेटे : म्हसळा  प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात गुरु दि. २७ जून ते मंगळवार दिं.१ जुलै या पाच दिवसांत धुँवाधार पावसाने म्हसळा कराने झोडपले. याचा फटका नागरीकाना व शेतकऱ्याना झाला. या कालावधीत शेतीतील कामे संथ गतीने झाली. काही ठीकाणी शेतकऱ्यानी मोडा (काम बंद)केला. तालुक्यांत आज पर्यंत ११४५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून पाच दिवसांत १५९.४ मि.मी.च्या सरासरीने ७९७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धुवाँधार बरसणाऱ्या पावसाचा फटका नागरिकांना व शेतकऱ्याना बसला. अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नुकसान झाले, नवे नगर , दिधी रोड परीसरांत गटारे, नाले तुंबून नागरी वस्तीत पाणी घुसत होते.या कालावधीत घरांचे छप्पर उडणे, वासे,कौले व कोने पडणे,पत्र्यांचे नुकसान होणे ह्या प्रकाराने तालुक्यातील पाभरे , कांदळवाडा, घुम,केलटे येथे सुमारे रु ४० हजाराचे नुकसान, वादळीवाऱ्यात विजेचा पोल पडून खरसई (गाय),काळसुरी (बैल ), म्हसळा ( म्हैस ) मृत होऊन शेतकऱ्यांचे १ लक्ष २७ हजार नुकसान, घोणसे येथे फरशी, कुंबळे येथे स्लॅपचे बांधकाम कोसळून सुमारे रु ३ लक्ष ४ हजार ९०० नुकसान झाल्याचे नायब तहसीलदार के.टी. भिंगारे यानीसांगितले.पुणे- दिघी राष्ट्रीय महामार्गावर एम.एमआर.डी. चे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षि व ठेकेदाराचे निकृष्ट कामामुळे शेतकऱ्याना आपल्या
शेतात जाण्यासाठी सुलभ रस्त्या नसल्याने अडचणी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

विजेचा लपंडाव दिवसभर सुरूच!

एकीकडे जोरदार पाऊस पडत असतानाच म्हसळा शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव अधूनमधून सुरूच होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही गावांतून तब्बल ३ते ४ दिवस विजपुरवठा नसल्याचे सांगण्यात आले.

B.S.N.L. व अन्य नेटवर्कने वाढविल्या अडचणी

भ्रमणध्वनी बंद अथवा नॉटरिचेबल असल्याचा संदेश सतत मिळत होता. B.S.N.Lचे मोबाईल टॉवर , बॉड बॅंड सेवा, सातत्याने बंद असल्याने कार्यायलीन कामकाजात व आपापसांतील बोलण्यात सतत व्यत्यय त्यामुळे नागरिक व शासकीय यंत्रणा पंचड बेजार झाली आहे.B.S.N.Lचे लॅंड लाईन फोनवरून झीरो अनेक वेळा लागत नसल्याने तालुका सोडून अन्यत्र संर्पक साधणे कठीण झाले आहे.


पंचनामे तात्काळ करण्याचे तहसीलदारांचे आदेश.
आतिवृष्टी , जोरदार पाऊस , वादळवाऱ्याने होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे तहसीलदार शरद गोसावी यानी मंडळ अधिकारी ,तलाठी याना दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा