सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकाऱ्यांचे सेवा निवृत्ती वय ६० वरुन ६२


वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे शासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, राज्य कामगार विमा रुग्णालये यामधून रुग्णाना आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात.वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या . योग्य आरोग्य सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होतात.वैद्यकिय अधिकारी पुरेशा प्रमाणांत उपलब्ध होत नाही,परिणामी आरोग्य सेवेतील पदे मोठया प्रमाणात रिक्त रहातात त्याचा राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होतो ह्याच मुख्य कारणाने सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकाऱ्यांचे सेवा निवृत्ती वय ६० वरुन ६२ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशासनिक सेवेमधील पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याचे सेवानिवृतीचे सध्याचे वय ६०वर्षे (दिं.३१.५. २०२३ पर्यंत ) . सेवानिवृत्तीचे वय न वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.जे वैद्यकिय अधिकारी थेट रुग्णसेवा देतात त्या अधिकाऱ्याचे सेवानिवृतीचे सध्याचे वय २ वर्षासाठी ६० वर्षे वरून ६२ वर्षे पूर्ण होई पर्यंत त्याना शासन सेवेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा