म्हसळा नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अहमदअली पेणकर यांचे ४ लक्ष १४ हजार नुकसान ; तहसीलदार गोसावीनी केली पाहाणी
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात आजपर्यंत १५०३ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाने झोड गाजवली होती. आज दिवस भरात सुमारे २००मि.मि च्या घरात पाऊस पडला असेल असा जाणकारांचा अंदाज आहे.
म्हसळा शहराची भौगोलीक रचना पहाता कितीही पाऊस पडला तरी निर्सग नुकसान करणार नाही . पडलेला पाऊस थेट जानसई,नदीला व लागून आसलेल्या राज्युरी खाडीने आरबी समुद्रात जायची नैसर्गिक स्थिती आहे.परंतु आजच्या पावसाने म्हसळा पोष्ट ऑफीसच्या मागील १५ ते २० वर्षांत नव्याने वसलेल्या वसाहतीला फटकारले त्यामध्ये मुस्लीम जमातीचे अध्यक्ष अहमद अली पेणकर , नईम पेणकर, सलाम अष्टीकर व अन्य ४ते ५ जणांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले . त्यामध्ये प्राधान्याने फर्नीचर व इले. इक्वीपमेंटचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे महसुलच्या प्रवक्त्याने सांगितले . सदरचे नुकसानी बाबत मुस्लीम जमातीचे अध्यक्ष अहमद अली पेणकर यानी किमान २ते ४ वेळा नगराध्यक्षा ना प्रत्यक्ष भेटून सांगितले नव्याने होणारी अनधीकृत बांधकामे पोस्ट ऑफीस व संपूर्ण म्हसळ्यात होणारी निकृष्ट दर्जाची व सदोष गटाराची बांधकामे चुकीची , भ्रष्ट मार्गाने सुरु आहेत त्याना आवर घाला , पण या सर्व गोष्टीकडे नगरपंचायत नगराध्यक्ष , Ceo यानी हेतूपुरस्कर दुर्लक्ष केले. याच कारणाने पेणकर यानी तालुका अपत्ती व्यवस्थापन विभाग व म्हसळा पोलीसांकडे रितसर तक्रार केली आहे.
"मुस्लीम जमातीचे अध्यक्ष अहमद अली पेणकर हे पापभीरू आहेत ते कधीही कोणाचाही आकस करीत नसताना, नगरपंचायत प्रशासन, Ceo, नगराध्यक्ष यानी पेणकर यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले हे अत्यंत चुकीचे आहे"
शोएब हळदे, विरोधी पक्ष नेते.
" सोमवार दिं.१ जुलै रोजी फार मोठया प्रमाणात १८५ मि.मि. पर्जन्यमान झाले होते त्यावेळी पेणकर यांचे सुमारे २ लक्ष ५ हजार , आजही प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली असता २ लक्ष ९ हजार नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यांत आला"
-महसूल सूत्र
"पेणकर यानी तक्रार करताना नगर पंचायतीपेक्षा ग्रामपंचायत कित्येक पटीने चांगली होती यांची नोंद शहरांतीत मुस्लीम व हिंदू समाज नक्कीच घेतील"
जूहर हुरजुक, माजी म्हसळा ग्रामपंचायत सदस्य.


Post a Comment