एप्रिल - मे ला दिले टंचाईला तोंड :पावसाळ्यात प्यावे लागते सदोष पाणी
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यांत ६० % नळ पाणी पुरवठा योजना या ग्रॅव्हीटी योजना आहेत त्यामुळे तालुक्यांतील बहुतांश नळ पा. पुरवठा योजनांतून दूषीत पाणी पुरवठा होत आहे.तालुक्यातील खारगांव ( बु ) या गावातील जनता गेले ४ महीने पाणी टंचाईला तोंड देत आहेत. स्थानिक सरपंच व कमेटी प्रयत्न करूनही त्याना यश येत नसल्याचे दिसत आहे .एप्रिल- मे मध्ये ग्रॅव्हीटीचे स्त्रोत्र आटल्याने व पाभरे धरणातील पाणी सोडल्याने एकाच वेळी नैसर्गिक व कृत्रिम संकट आले. आता पाऊस मुबलक पडल्याने ग्रॅव्हीटी योजनेचे पाईप चोक अप झाल्याने पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थाना गावांत असणाऱ्या जुन्या ३वीहीरी व १ हातपंप यांचे पाणी वापरावे लागते हातपंपाचे अगर विहीरीचे पाणी साठवण टाकीत जात नसल्याने त्या पाण्याचे शुध्दीकरण होत नसल्याचे अगर त्या कोणत्याही पाण्याचे स्त्रोत्राचे नमुने ग्रामपंचायत प्रशासन अगर आरोग्य विभागा मार्फत प्रयोगशाळेत तपासले गेले नसल्याचे स्थानिक सरपंच अनंत नाक्ती यानी आमचे प्रतिनिधीला सांगितले .ढूषीत पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येताच गटविकास अधिकारी वाय.एम. प्रभे यानी ग्राम विस्तार अधिकारी सुनिल गायकवाड व ग्रामसेवक हरीभाऊ बेंडूक याना प्रत्यक्ष पहाणी करुन योग्य त्या साधनांचा वापर करून स्थानिक नागरीकाना पिण्यायोग्य पाणी पुरवठा व्हावा असे आदेश दिले आहेत.
"खारगांव ( बु ) ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून रु३७.६५ लक्ष ची योजना मंजुर आहे. योजनेची वर्क ऑर्डर ८ मार्च २०१९ ला दिलेली आहे. ग्रामस्थांच्या मागणी नुसार जुन्या ग्रॅव्हीटी स्त्रोत्रा वर नवीन पाईप लाईनने योजना करण्याचे प्रस्तावीत आहे"
श्री.वाय. एम. गांगुर्डे. उपअभियंता , ग्रा.पा. पु. म्हसळा.
"खारगांव ( बु ) गावात तीन वीहीरी आहेत, एक विहीर तळ्याचे शेजारी व अन्य दुसरी शेताच्या शेजारील विहीर आहे त्या विहीरींच्या पाण्याचा वापर शक्यतो करु नये . पाणी पीण्यापूर्वी शुध्दीकरण करुन प्यावे"
-सुनील गायकवाड, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, पं.स. म्हसळा.
"खारगांव ( बु ) ग्रामपंचायतीमधील प्रत्येक कुटुंबाला मेडी क्लोअरचा पुरवठा करण्यात येणार आहे.पाणी गाळून ,उकळून पिण्याबाबत दवंडी व मार्गदर्शन करण्यात येणार असून. जुनी नळ पाणी पुरवठा योजना सरपंचांचे मार्गदर्शनानी तात्काळ सुरु करण्यात येईल"
-एल.एच. बेंडूक, ग्रामसेवक , गृ. ग्रा.पंचायत खारगाव( बु )
फोटो : खारगाव ( बु ) मधील विविध पाण्याचे स्त्रोत्रांची पहाणी करताना सुनिल गायकवाड व हरीभाऊ बेंडूक छायाचित्रात दिसत आहेत.



Post a Comment