संजय गांधी निराधार योजनेंर्तगत म्हसळ्यातील ४० प्रस्ताव मंजूर समिती अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
म्हसळा : वार्ताहर
तालुक्यातील गरीब , गरजू घटकातील लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत शासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या पेन्शन मार्फत म्हसळा तालुका समितीकडे आलेल्या ४४ प्रस्तावापैकी ४० प्रस्ताव मंजूर झाले असल्याचे समिती अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी माहिती देताना सांगितले. या योजनेंतर्गत प्राप्त झालेले प्रस्ताव नियमानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना , श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेत वर्गीकरण करून निकषानुसार मंजूर केल्याचे सांगण्यात आले . तहसीलदार कार्यालयात म्हसळा तालुका समितीची बैठक प्रकाश रायकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या सभेला सदस्य सचिव तथा तहसीलदार शरद गोसावी , सदस्य अनिल टिंगरे , यशवंत म्हात्रे , ग , वि . अ . यांचे प्रतिनिधी चौधरी , नायब तहसीलदार के , टी . भिंगारे , अ . का . विशाल भालेकर , सरिता लिमकर , नुतन गोविलकर आदी उपस्थित होते . सभेत ४४ अर्ज दाखल झाले होते . त्यातील परिपुर्ण ४० लाभार्थीच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली . माहे सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागणार असल्याने या योजनेतील लाभार्थी शासनाच्या वतीने मिळणाच्या लाभापासून वंचित राह नये म्हणून पुढील महिन्याच्या १३ तारखेला म्हसळा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची मिटींग घेणार असल्याचे समिती अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी माहिती देताना सांगितले . या योजनेंतर्गत केंद्र व महाराष्ट्र शासनाचे वतीने संजय गांधी अपंग योजनेतील प्रस्तावास प्रतिमहा रु . ८०० , संजय गांधी विधवा योजनेतील लाभार्थी करिता प्रतिमहा रु . ६०० , इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना करिता प्रतिमहा रु . ६०० , श्रावणबाळ योजनेकरिता प्रतिमहा रु . ६०० अनुदान देण्यात येणार असल्याचे धान्ने यांनी सांगितले.

Post a Comment