50 कोटी वृक्ष लागवडीत म्हसळयातील पत्रकारांचा खारीचा वाटा : तहसील ऑफीस प्रांगणात केली वृक्ष लागवड

50 कोटी वृक्ष लागवडीत म्हसळयातील पत्रकारांचा खारीचा वाटा : तहसील ऑफीस प्रांगणात केली वृक्ष लागवड

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
वनांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत की, त्यांची ओळख त्या देशामध्ये असलेल्या समृध्द वनांमुळे जगाला झाली आहे. सर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या राज्यात 20 टक्क्यांच्या जवळपास क्षेत्र वनाखाली आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहे. वृक्ष पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन 2017 ते 2019 या दरम्यान राज्यामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेंतर्गत सन 2016 मध्ये 2 कोटी, सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला असून सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवड,सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट
ठेवण्यात आले आहे. त्याला अनुसरून म्हसळा प्रेस क्लबच्या माध्यमातून गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने वृक्ष हेच गुरुतुलल्य समजुन म्हसळा तहसील ऑफीसच्या प्रांगणात वृक्ष लागवड केली. यावेळी तालुका प्रेस क्लबच्या समवेत तहसिलदार शरद गोसावी यांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले यावेळी नायब तहसिलदार के.टी.भिंगारे,अध्यक्ष शशिकांत शिर्के,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,उदय कळस,उपाध्यक्ष अंकुश गाणेकर,सचिव महेश पवार,सुशिल यादव,महसूल विभागाचे जितेंद्र टेंबे, पो.ना सुर्यकांत जाधव ,अमर ठमके,वनविभागाचे रामकृष्ण कोसबे आण्णा,वनपाल थळ कर, एच. यु.बनसोडे, अंगद भोसले,दुधाने आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा