संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
तिवरे धरण दुर्घटने मुळे खरसई कर चिंताग्रस्त होऊन स्थानिक मंडळीनी सोशल मिडीयाचे माध्यमातून अभ्यासू प्लॅटफॉर्म तयार केले, त्यातच ठरले शासनाकडे १९८० पासून प्रस्तावित ,अर्धवट व धोकादायक असलेले धरण पूर्णत्वाला गेलेच पाहिजे असा पक्का निर्णय मुंबई व स्थानिक मंडळींचा झाला आहे.
खरसई धरणाची अख्यायिका
लघुपाटबंधारे विभागाकडून दि. २३.१०.१९८० रोजी रु ४४.६१ लक्ष ला प्रशासकीय मान्यता मिळाली, त्यामध्ये कामा पित्यर्थ रु३६.९५ लक्ष व अनुषंगीक खर्चरु ७.७२ लक्ष मिळाली.
काम सुरु होव्यापूर्वीच डिसेंबर १९९४ साली लघुपाटबंधारे विभागाकडून सदरचे काम जलसंधारण विभागा हस्तांतरीत करण्यात आले. १४.३.१९९५ रोजी सुधारीत अंदाजपत्रक करुन रु२०७.७० लक्ष लाप्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामध्ये कामा पित्यर्थ रु१६६. ८४ लक्ष व अनुषंगीक खर्च रु ४०.८६ लक्ष मिळाली.
१९९८ मध्ये १९९५- ९६ च्या दरसूचीनुसार ३.१.१९९८ रोजी
रु३३३.७३ लक्ष लाप्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामध्ये कामा पित्यर्थ रु२६९.२४ लक्ष व अनुषंगीक खर्च रु ६४.४९ लक्ष मिळाली.
त्यानंतर पुन्हा सुधारीत अंदाजपत्रकास रु९१३.८४ लक्षला प्रशासकीय मान्यता मिळाली, त्यामध्ये कामा पित्यर्थ रु८३३.५८ लक्ष व अनुषंगीक खर्चरु ८०.२५ लक्ष ला मंजुरी मिळाली . पुन्हा एकदा ९.२.२००९ रोजी सुधारीत अंदाजपत्रक करुन रु ९१८.४६ लक्षला प्रशासकीय मान्यता मिळाली, त्यामध्ये कामा पित्यर्थ रु८३७ .७९ लक्ष व अनुषंगीक खर्चरु ८०.६७ लक्ष ला मंजुरी मिळाली.
१९८० साली खरसई धरणासाठी प्रशासकीय मंजुरी रु ४४.६१ लक्ष होती काम पूर्ण न होता आजपर्यत धरणाचे बजेट रु९१८.४६ लक्ष झाले आहे. धरणाचे काम केवळ ५२ % झालेले असताना शिल्लक रक्कम केवळ रु ९८.९० लक्ष शिल्लक आहे. म्हणजे काम ४८ % बाकी व शिल्लक रक्कम केवळ १० % आहे.
धरणाची प्रमुख वैशिष्टे
पाणलोट क्षेत्र १.७८ चौ.कि.मी, एकूण पाणीसाठा १९५४.५०, सिंचन क्षमता १५६ .२७ हेक्टर, लाभ क्षेत्रांतील गावे :खरसई, आगरवाडा, रेवली, बनोटी.
१९८० ते २०१९ या कालावधीत ३ वेळा कॉंग्रेस त्यामधे माजी मुख्यमंत्री अे.आर. अंतुले, र.ना.राऊत, शिवसेना १५ वर्ष श्याम सावंत , तुकाराम सुर्वे, २oo९ ते आज तागायत राष्ट्रवादी काँग्रेस दोन वेळा सुनील तटकरे, अवधुत तटकरे यानी प्रतिनिधीत्व केले. यापैकी धरण पूर्ण होण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीनी विशेष प्रयत्न अगर पाठपुरावा केला नाही . तत्कालीन पाटबंधारे मंत्री यानी २६ डिसें २०१० रोजी जलपूजना व्यतीरीक्त काहीही केले नाही .
तीवरे धरण, रितसर बांधून सुद्धा फुटले, त्याचप्रमाणे खरसई धरणाच्या सुरक्षेकडे गाव पातळीवरील लॊकांनी विशेष लक्ष्य दयावे ,गेली ३५ वर्ष खरसई धरणाचे काम चालू होते ते आज पर्यंत अपूर्ण अवस्थेत आहे , अजून अनेक उर्वरित कामे बाकी आहेत , व गळती सुरु झाली आहे ,कालवा , स्मोवरील पिचिंग सुरक्षा भिंत , हि कामे अपूर्ण आहेत ,असे दिसतंय त्याचप्रमाणे मुकुंद म्हात्रे आगेटी भागाकडून पाण्याचा वेग व उतार त्या बाजूने जास्त जबरदस्त आहे ,त्याबाजूने गावाला धोका होऊ शकतो , कारण लाल माती ची धूप लवकर होते ,दुर्लक्ष करून चालणार नाही . सर्वप्रथम धरणाची सुरक्षा व काळजी आपण सर्वानीच घ्यायची आहे , त्याची डागडुगी गळती ,या कडे लक्ष्य देणे गरजेचे आहे , हि आपल्या सर्वांची जबादारी आहे ,गाव पातळीवरील लॊकांनी विशेष लक्ष्य द्यावे. गावाचे मीटिंग मध्ये चर्चा करून कामकाजाचा आढावा घेणे जरुरी आहे.
-यशवंत म्हसकर सामाजिक कार्यकर्ते , खरसई
तिवारे धरण हे खरसई धरणापेक्षा विस्ताराने कितीतरी लहान आहे आपल्या धरणाचा प्रचंड पाणीसाठा आणि त्याचा दाब हा त्यापेक्षा प्रचंड आहे ! आमदार खासदार यांना हाताशी धरून अशी प्रलंबित कामे अगोदर पूर्णत्वास नेणे गरजेचं आहे. नवीन कामे नंतर केली तरी चालतील पण या कामाला प्रथम प्राधान्य देणं जरूरीचे आहे ! याकरता सर्व राजकीय प्रादेशिक पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येऊन हे काम जलद गतीने करवुन घायला हवं !
-रमेश म्हात्रे, खरसई
खरसई धरणाचे काम खुप वर्ष टिकले पाहिजेत .धरणात पाणी साठण्याआधी, त्यामधील कोणत्याही प्रकारची गाळ, मोठ मोठी झाडे, खुप सारी दगडे, ना कोणत्याही प्रकारची धरणात लेवल झाली नाहि, ना धरणाची व्यवस्थित पिचिंग झाली. अशी अनेक प्रकारची कामे अपूर्ण आणि सदोष आहेत. त्यामुळे आपल्या धरणाला तिवरे धारणाप्रमाणेच धोका होऊ शकतो, यासाठी वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
-जतीन पयेर, युवा अधिकारी, शिवसेना.
"धरणाची किंमत रु४४.६१ लक्ष होती, ती रु९१ ८.४६ लक्ष झाली सुमारे २ हजार पटीने वाढली , त्याच पटीने ४० वषापूर्वी घेतलेल्या जमीनींचे भाव शेतकऱ्याना मिळालाच हवे"
-परशुराम मंदाडकर, खरसई
धरणाचे कामात प्रशासकीय पातळीवर कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे. काम सदोष असतानाच त्रुटी अनेक आहेत. धरणाचे काम पूर्ण होणे व डावा , उजवा कालवा झाला तरच खऱ्या अर्थाने पाण्याचा वापर होईल. त्याच बरोबरीने दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे"
-महादेव पाटील, माजी सभापती.


Post a Comment