श्रीवर्धन मतदारसंघ शिवसेनेचाच ; अनिल नवगणे


म्हसळा प्रतिनिधी
 श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यावर आमचाच हक्क कायम राहणार आहे. या मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने आम्ही पूर्ण ताकतीने लढणार असून आमचाच उमेदवार विजयी होणार असा ठाम विश्वास शिवसेना  माणगाव तालुका प्रमुख अनिल नवगणे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केला.शिवसेनेचे मजबूत नेटवर्क गावोगावी असूनही लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांचा झालेला पराभव हा शिवसैनिकांसाठी धक्का होता. मात्र विधानसभेला उट्टे भरून काढायच्याच निर्धाराने शिवसैनिक कामाला लागले आहेत.या लढती वेळी आमच्या काही उणिवा राहिल्या. त्याचे आम्ही आत्मपरीक्षण करणार असून त्या उणिवा पूर्ण करणार आहोत.श्रीवर्धन मतदार संघात मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा थोडक्या मताने पराभव झाला होता.त्यानंतरही झालेल्या नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे आजही या मतदार संघात शिवसेनेचेच वर्चस्व आहे.त्यामुळे शिवसेनेचा आमदार सहज निवडून येऊ शकतो असे पुढे बोलताना अनिल नवगणे यांनी सांगितले. विधानसभेला आपण इच्छुक आहात का याबाबत नवगणे यांना विचारले असता श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेकडून अनेक इच्छुक आहेत. मी सुद्धा विधानसभा लढवायला तयार असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्यांचे  निष्ठेने काम करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा