म्हसळा पोस्ट ऑफीसची दयनीय स्थिती इमारत सडली : काँप्युटर यंत्रणा बंद पडली. महत्वाच्या टपाल सेवा पडल्या बंद



संजय खांबेटे : म्हसळा  प्रतिनिधी
म्हसळा पोस्ट ऑफीसची इमारत अतिशय बिकट परिस्थितीत आहे.R.C.C व स्लॅप कधीही कोसळल अशी सध्या स्थिती आहे.अनेक ठिकाणी दुर्घटना होत असताना म्हसळा पोस्ट ऑफीसच्या इमारतीवर अशी वेळ नको अशी प्रार्थना आधिकारी, कर्मचारी व म्हसळयातील ग्राहक करीत आहेत. सतत छ्ता कडे बघत काम करतानाच कार्यालयांतील बहुतांश कॉप्युटर बंद पडले असून कार्यालया मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा पूर्णपणे बंद पडल्या आहेत.
पोस्ट ऑफीसची इमारत जिवघेणी असली तरी त्यांच्या सेवा मोना पॉली ( मक्तेदारी)च्या असल्याने पोस्टाखेरीज त्या अन्यत्र मिळत नाही. इमारती पाठोपाठ काँप्युटर बंद पडल्याने म्हसळा पोस्ट ऑफीस मधून मंगळवार दि.२ जुलै पासून रजिस्टर, स्पिड पोस्ट,रजिस्टर पार्सल , परदेशांत जाणारी पत्रे,पार्सल, विमा पत्रे, डाक, विमा हप्ता,बचत खाते व्यवहार, मनी ऑर्डर, टेलीफोन बिल भरणा, पोस्टल ऑर्डर विक्री, मनी ट्रान्सफर, विमा पॉलीसी हे सर्व व्यवहार ठप्प आहेत. उप-डाकपाल, पोस्टल अस्सी स्टंट, एम.टी.एस., पोस्टमन असे ७ ते ८ कर्मचारी आहेत. रोज ८०-९० ग्राहकांची सातत्याने कार्यालयात ये- जा असते.तालुक्यांतील केलटे, खामगाव, खरसई, कोळवट, मजगाव, चिखलप, गोंडघर, ताम्हने, में दडी, पाभरे, साळविंडे, तळवडे, वरवढणे या सब पोस्ट ऑफीस मधील कार्यालयीन कामे सुद्धा म्हसळा पोस्टावर अवलंबून असतात ही सर्वच कामे काँप्युटर मुळे बंद आहेत. संपूर्ण भारतभर डिजीटल इंडियाचे कामकाज गतीमान होत असताना म्हसळा पोस्ट ऑफीसच्या सेवा कॉंप्यूटर बंद म्हणून बंद हे हास्यास्पद असल्याची चर्चा म्हसळा शहर भर सुरु आहे.



"रजी. अे.डी, स्पिड पोस्ट सुविधेबाबत विचारले असता काँप्युटर बंद असल्याने सेवा बंद आहेत सांगण्यात आले, इमारत पडकी व बहुतांश ठिकाणी स्लॅप कोसळण्याची भिती वाटते. देशात , राज्यात पोस्ट ऑफीस डीजीटल व स्मार्ट बनत असताना म्हसळा पोस्टाची दुर्दशा का?"
उदय करडे, म्हसळा



" कार्यालयांतील दोन काँप्युटर बंद पडल्यामुळे कालपासून कामकाज ठप्प आहे, वरीष्ठ कार्यालयाला तशा पध्दतीची माहीती दिली आहे . वरीष्ठ कार्यालयालाकडून तज्ञ आल्यावर पोस्टल सेवा सुरु करण्यात येतील"
आय.एम. शेख, प्रभारी उप-डाकपाल, म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा