वृक्ष लागवडीपेक्षा वृक्षांचे संवर्धन अत्यावश्यक असून संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच आहे. -सहाय्यक वनसंरक्षक गोडबोले



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रम दिनांक 01 जुलै जागतिक वनमहोत्सवाचे औचित्य साधून म्हसळा तालुक्यातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती केलटे येथे घेण्यात आला. रोहा वनविभाग क्षेत्रातील म्हसळा वनविभाग, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय केलटे आणि कोळे- केलटे संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमास रोहा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक के.व्ही.गोडबोले, तहसिलदार शरद गोसावी, पोलिस उपनिरीक्षक दिपक धुस, वनक्षेत्रपाल एन.डी.पाटिल, सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल के.बी.पाटकर, परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक, सरपंच श्रीम.कासरूंग,गाव अध्यक्ष शांताराम कोबनाक,रामचंद्र बोर्ले, मंडळ अधिकारी राम करचे,  तलाठी संतोष विरकूड, अंबावकार, ग्रा.प.सदस्य महेश घोले,पोलिस पाटिल किसन पवार, ग्रामसेवक भुपेश अहिरे, मुख्याध्यापक प्राथमिक शाळा सुनिल पवार,मुख्याध्यापिका पी.एन.पी.स्कूल केलटे श्रीम.दर्गे,ग्रामस्थ,शिक्षक,वनविभाग म्हसळा येथील वनपाल, वनरक्षक आदि मान्यवर उपस्थित होते. 
  रोहा वनविभाग सहाय्यक वनसंरक्षक के.व्ही.गोडबोले यांच्या हस्ते वृक्ष लावून वनमहोत्सवास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक यांनी करताना वनविभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या सर्व योजनांची सविस्तर माहिती सांगून तालुक्यातील सर्व वनव्यवस्थापन समित्या व ग्रामस्थ यांचे अनमोल सहकार्य मिळाल्याचे सांगून सर्व उपस्थितांचे एक-एक रोपटे देऊन स्वागत केले. वनरक्षक भिमराव सूर्यतळ यांनी गीताच्या माध्यमातून वनमहोत्सवाचे महत्व स्पष्ट केले. तहसिलदार शरद गोसावी, वनक्षेत्रपाल एन.डी. पाटिल आदि मान्यवरांनी वनमहोत्सवाचे महत्व पटवून दिले. या प्रसंगी मनोगतात सहाय्यक वनसंरक्षक के.बी.गोडबोले वनमहोत्सवासारख्या कार्यक्रमास एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांना धन्यावाद देऊन खऱ्या अर्थाने समाधान व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगीतले कि फक्त वृक्ष लागवड करून आपली जाबाबदारी संपली असे समजण्यापेक्षा त्यांचे संरक्षण होणे ही सर्वांचीच सर्वात मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. हिंदू धर्मात 33 कोटी देव मानले जातात त्याच प्रमाणे प्रत्येक झाड हे 33 कोटी देवांप्रणाने असल्याचे समजून त्या झाडाची देवाप्रमाणेच जोपासना करण्याचे आवाहन गोडबोले यांनी केले. वृक्ष लागवड न केल्यास पर्यावरणावर त्याचा विपरीत परिमाण तर होतोच त्याशिवाय तीव्रपाणी टंचाईला सामोरे जावे लागते.त्याची झळ यावर्षी संपूर्ण राज्याला भासविली याचे गांभीर्य प्रत्येकाने लक्षात घेऊन एकतरी झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन याप्रसंगी गोडबोले यांनी केले. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा