अलिबाग येथील प्रकल्प पुनरूज्जीवित करण्याची खा.सुनिल तटकरे यांची सभागृहात मागणी



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

 ता.अलिबाग, जि. रायगड येथील अमोनिया आणि युरियाचा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याबाबत आज रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी संसदेत पुरवणी प्रश्नाच्या माध्यमातून सरकारला निवेदन केले असल्याची माहिती खासदार सुनिल तटकरे यांच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
 युरियाचा जगभरातील सर्वांत मोठा ग्राहक हा भारत देश असून इथले शेतकरी वर्षाला ३० ते ३१ दशलक्ष टन युरिया वापरतात. यापैकी साधारण २४ दशलक्ष टन युरिया देशातच बनवला जातो तर उर्वरित आयात केला जातो. त्यामुळे युरियाच्या बाबतीत देशाने स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता आहे. ही आवश्यकता आदरणीय शरद पवार साहेबांनी वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री असतानाच समोर आणली होती, असा उल्लेख तटकरे यांनी संसदेत केला.
 आज सिक युनिट रिवायवल प्लॅन (सर्प) च्या माध्यमातून ७.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून केंद्र सरकार पूर्व भारतातील खतांच्या प्रकल्पांना नवसंजीवनी देण्याची योजना तयार करत आहे. ही बाब खरी आहे का, असा प्रश्न त्यांनी सरकारला केला. तसे असल्यास थळ, अलिबाग येथील रु.५५३० कोटींच्या नियोजित अमोनिया आणि युरियाच्या प्रकल्पाचेही सरकार पुनरुज्जीवन करणार का, असा प्रश्न त्यांनी यावेळी मांडला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सभागृहात मंत्री महोदयांनी आपली मागणी विचारात घेतली असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे थळ येथील युरिया प्रकल्पाला नवं जीवन मिळणार असून खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यात नवीन रोजगार निर्मितीदेखील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा