म्हसळा पोलीस विचीत्र मनस्थितीत चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या जेष्ठ महीलेला तब्बल दोन तास धरले वेठीला
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
राज्यातील पोलीस प्रशासन अनेक वेळा, जेष्ठ नागरिकांसाठी विविध सोयी, सुविधा, मनमोकळे जिवन व्यतीत करण्यासाठी संवाद, जेष्ठ महीलाना मन मोकळे व्हावे यासाठी महीला पोलीसाना त्यांच्या घरी जाऊन संवाद, औषधे आणून देणे असे अतीशय चांगले पोलीस प्रशासनाचे कौतुक करावे असे नाविन्य पूर्ण उपक्रम राबविले जातात परंतु म्हसळा पोलीसानी या सर्व उपक्रमांवर पाणी ओतले, आज म्हसळा पोलीसांत चोरीची तक्रार देयला आलेल्या जेष्ठ महीलेला तब्बल दोन तास तक्रार न घेताच वेठीस धरून ठेवले. म्हसळा तालुक्यातील देवघर येथील साईनाथ सेवा ट्रस्टच्या संस्थापक श्रीमती आशा शिवाजी चाळके वय ६७ ह्यांच्या घरातील व साई मंदीरातील चोरीच्या घटनेची तक्रार देयला त्या म्हसळा पोलीसांत गेल्या असताना म्हसळा पोलीसांकडून मनाला क्लेश देणारा अनुभव त्याना आला. चाळके आजींच्या घरात शुक. दि.१२ ला रात्री ११. ३०ते पहाटे ४च्या दरम्यान चोरी झाली , चोरट्यानी आजीच्या घरातील दोन चांदीच्या देवाच्या मूर्ती व साई मंदीरातील चावी चोरली, नंतर मंदीरांत काही सापडते का बघायला कपाट फोडले तेथून त्याने केवळ अत्तर बाटली घेतली. व तेथेच एक सफेद रंगाची टॉर्च व जॅकेट सोडून गेल्याचे आजीने पोलीसात सांगितले.
घटनाक्रम व म्हसळा पोलीसांची दयनीय स्थिती
आशा शिवाजी चाळके व साईभक्त अनिल महामुनकर आज सकाळी १०.३०च्या दरम्यान म्हसळा पोलीसांत चोरीची तक्रार देण्यासाठी पोहचले. ठाणे अमलदार महीला H.C. सी.आर. कोपनर यानी चोरीची खबर तात्काळ घेणे जरुरी असताना तब्बल दोन तास टाळाटाळ करीत होत्या, तब्बल दोन तासानी खबर घेतली ,घटनास्थळी जाण्यासाठी रिक्षा ( पोलीस जिप उपलब्ध असताना) आणण्याबाबत सांगितले. चाळके अजीनी नकार दिला मी घरी जाते तुम्ही सवडीनी या असे सांगितले. म्हसळा पोलीसानी तब्बल दोन तास उशिरा खबर घेतली, सायं ५ वा.पर्यंत खबरीची प्रत आजीना देण्यात आली नाही , कार्यालयांत वरीष्ठ नसल्याने घटनेची नोंद केली नसल्याचे ठाणे अमलदार महीला H.C. सी.आर. कोपनर यानी सांगितले.
"चोरीचे घटने नंतर कमीत कमी वेळाचे आवधीत पोलीसांत तक्रार नोंदवावी व चोरटे सोडून गेलेल्या वस्तूंच्या आधारे तपास गतीमान व्हावा या उद्देशाने चाळके आजीने तात्काळ पोलीसांत येऊनही म्हसळा पोलिसानी केलेले कृत्य व जेष्ठ अशा चाळके आजीना दिलेली वागणूक निषेधार्य आहे"
महादेव पाटील , मा. सभापती , पं.स. म्हसळा

Post a Comment