म्हसळा करानी केलटे येथे वृक्ष लागवड करून केली सुरवात
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यांतील संयुक्त व्यवस्थापन केलटे, ग्रामस्थ मंडळ, महीला मंडळ व म्हसळा वन क्षेत्राच्या माध्यमातून केलटे येथे लागवड करून २०१९ चे राज्याचे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी उत्साहांत सुरवात केली. तालुक्यात ११ लक्ष ६४ हजार ९९८ वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. केलटे येथील कार्यक्रमाला रोहा वन विभागाचे सहाय्यक वन संरंक्षक के.व्ही. गोडबोले, तहसीलदार शरद गोसावी, वन क्षेत्रपाल निलेश पाटील, लागवड अधिकारी कुलदिप पाटकर, रामचंद्र बोर्ले, गणेश बोर्ले, उमेश पवार, किसन पवार, मुकुंद बोर्ले, ज्ञानेश्वर कोबनाक, धाडवे, मुख्याध्यापिका श्रीमती दर्गे, स्थानिक महीला मंडळ . माध्यमिक व प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद , विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते.
यावेळी प्रस्तावनेत वनपाल बाळकृ गोरनाक यानी वनांचे महत्त्व , जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत की, त्यांची ओळख त्या देशामध्ये असलेल्या समृध्द वनांमुळे जगाला आहे. सर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या राज्यात 20 टक्क्यांच्या जवळपास क्षेत्र वनाखाली आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहे. वृक्ष पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन 2017 ते 2019 या दरम्यान राज्यामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेंतर्गत सन 2016 मध्ये 2 कोटी, सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला असून सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवड,सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आसल्याचे सांगितले.
"तालुक्यात ११ लक्ष ६४ हजार ९९८ वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. कडुलिंब, आवळा, सिसव, हिरडा, वेला,काजू, कांचन, करंज, बहावा, बांबू, खैर आदी स्थानिक प्रजातींची दर्जेदार झाडे लागवडीस उपलब्ध करण्यात येणार आहेत"निलेश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी म्हसळा



Post a Comment