मुसळधार पावसामुळे म्हसळा तालुक्यात नैसर्गिक आपत्तीने 2 लक्ष 72 हजाराचे नुकसानीची नोंद ; तहसीलदारांचे पंचनामे करण्याचे आदेश
म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यात दिनांक 27 जुन पासुन जोरदार पर्जन्यवृष्टी होत असुन तालुक्याला सहा दिवस अक्षरशः झोडपून टाकले आहे याचा फटका नागरीकाना व शेतकऱ्याना बसला आहे. या कालावधीत शेतीतील कामे संथ गतीने होत आहेत. काही ठीकाणी शेतकऱ्यानी मोडा (काम बंद) केला. तालुक्यात आज पर्यंत 1174 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे सहा दिवसांत 159.4 मि.मी.च्या सरासरीने 826 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नुकसान झाले तर नवे नगर, दिघी रोड परीसरांत गटारे, नाले तुंबून नागरी वस्तीत पाणी घुसत होते. या कालावधीत घरांचे छप्पर, वासे, कौले व कोने पडणे, पत्र्यांचे नुकसान होणे ह्या प्रकाराने तालुक्यात एकुण 2 लक्ष 71हजार 900 रुपयांची नैसर्गिक आपत्तीने नुकसान नोंद झाली आहे.
तालुक्यातील पाभरे, कांदळवाडा, घुम, केलटे येथे सुमारे 40 हजाराचे नुकसान, वादळीवाऱ्यात विजेचा पोल पडून खरसई येथे गाय, काळसुरी येथे बैल, म्हसळा येथे म्हैस मृत होऊन शेतकऱ्यांचे 1 लक्ष 27 हजाराचे नुकसान झाले आहे तर घोणसे येथे फरशी, कुंबळे येथे स्लॅपचे बांधकाम कोसळून सुमारे 3 लक्ष 4 हजार 900 चे नुकसान झाल्याचे नायब तहसीलदार के.टी.भिंगारे यांंनी माहिती देताना सांगितले. पुणे- दिघी राष्ट्रीय महामार्गावर एम.एमआर.डी.चे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व ठेकेदाराचे निकृष्ट कामामुळे शेतकऱ्याना आपल्या शेतात जाण्यासाठी सुलभ रास्ता नसल्याने अडचणी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
विजेचा लपंडाव रोजच दिवसभर सुरूच!
एकीकडे जोरदार पाऊस पडत असतानाच म्हसळा शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव अधूनमधून सुरूच होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही गावांतून तब्बल 3 ते 4 दिवस विजपुरवठा नसल्याचे सांगण्यात आले.
बीएसएनएल व अन्य नेटवर्कने वाढविल्या अडचणी---
भ्रमणध्वनी बंद अथवा नॉटरिचेबल असल्याचा संदेश सतत मिळत होता. बीएसएनएल चे मोबाईल टॉवर , बॉड बॅंड सेवा, सातत्याने बंद असल्याने कार्यायलीन कामकाजात व आपापसांतील बोलण्यात सतत व्यत्यय त्यामुळे नागरिक व शासकीय यंत्रणा प्रचंड बेजार झाली आहे. बीएसएनएल चे लॅंड लाईन फोनवरून झीरो अनेक वेळा लागत नसल्याने तालुका सोडून अन्यत्र संर्पक साधणे कठीण झाले आहे.
"तालुक्यात अतिवृष्टीने होणाऱ्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तालुका तहसीलदार शरद गोसावी यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले आहेत.

Post a Comment