● पीएनपी हायस्कूल पाष्टी मधे सुरज करावडे प्रथम
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील खाडीपट्ट्यात असलेल्या दुर्गम भागातील तोराडी गावातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. यामध्ये काळसेकर कांबळे महाड हायस्कूल मधे शिक्षण घेत असलेला बंडवाडी गावातील विद्यार्थी कु.अरहान इकबाल कौचाली याने 83.60% गुण मिळवून अल्पसंख्याक सेल विद्यार्थ्यांमधून म्हसळा तालुक्यात प्रथम येणाचा मान मिळवला आहे.
त्याचबरोबर पाष्टी येथील पीएनपी हायस्कूलमधून तोराडी गावातील कुमार सुजल कैलास करावडे याने 83.20% गुण मिळवून हायस्कूल मधे प्रथम क्रमांक मिळवला आहे. दोन्हीही विद्यार्थ्यांच्या यशात आई-वडील, शिक्षक व नातेवाईकांचे मार्गदर्शन मोलाचे होते असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
तसेच बंडवाडी व तोराडी गावातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment