संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
बहुतांश म्हसळा तालुक्यातील नागरीक व बळीराजा मागील दीड ते दोन महिने पाणी टंचाई व वाढत्या उष्णतामानाने
ऊकाड्याला तोंड देत आहेत. त्यातच पावसाळा सुरु होण्याचे नैर्सगीक संकेत मिळत नसल्याने पेरणी ५-६ तारखे पर्यंत म्हणजे उशीरा झाली , आज सकाळपासून दिवसभर आकाश भरून येत असतानाच म्हसळा तालुक्यातील काही भागात पाऊस शिंतडल्याने म्हसळाकर व बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.
तालुक्याचे भात पिकाचे क्षेत्र 2400 हेक्टर आहे, व पेरणी क्षेत्र -240हेक्टर आसल्याचे कृषिविभागाने माहीती दिली. कर्जत ७, सुवर्णा, चिंटू, जोरदार, इंद्रायणी, वाडा कोलम या जातीचे भात बियाणे शेतकऱ्यानी वापरले आहे. पंढरीनाथ, कोकण सफेद, लाल नाचणी, दापोली २ ह्या जातीचे नाचणीचे बियाणे वापरले आहे.
सर्व साधारणपणे शेतकरी वर्ग रोहीणी नक्षत्रांत पेरणी करतात अशा प्रघात असला तरी प्राणी -मात्रांच्या हालचाली वरून ( काजवा, लाल ढेकण्या, उडणाऱ्या मुंग्या, दिव्यांवरील पाखरे इत्या.) पाऊस उशीरा आहे त्यामुळे तालुक्यातीत शेतकऱ्यानी जुनच्या पहील्या आठवडयांत ५ जून पर्यंत पेरणी पूर्ण झाली.-नथुराम कमळाकर खोत, सदस्य , शेतकरी आत्मा संघटना.
तालुक्यात भात, नाचणीची संकरीत व सुधारीत बियाणे शेतकऱ्याना पुरवीली आहेत. या वर्षी शेतकऱ्याना कंदवर्गीय भाज्यासांठी सुरण, आळू, करंजा हे कंद पुरविले आहेत.
-शिवाजी राठोड , कृषि पर्यवेक्षक , खामगाव ता. म्हसळा
Post a Comment