मरणोत्तर नेत्रदान करून श्री व सौ आंधळे यांचा जगापुढे आदर्श...!

श्री.मिठ्ठू आंधळे व सौ.वैशाली आंधळे यांचा मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्पआज जागतिक दृष्टीदान दिनी केला संकल्प ; श्रीवर्धन आगारात वाहक म्हणून आहेत कार्यरत

प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह 
'अनंताच्या पलिकडे जाऊनही अस्तित्व उरावं,तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं".या जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने अंधारातून प्रकाशाकडे हा बदल आपण घडवु शकतो.याचाच प्रत्यय रामनगर, तलवाडा ता.गेवराई येथील "देव हा देवळांत नसुन, तो दीनदूबळ्या,अनाथ, वंचितांमध्ये आहे" या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्य करणारे दाम्पत्य श्री.मिठ्ठू त्रिंबक आंधळे व सौ.वैशाली मिठ्ठू आंधळे यांनी आज जागतिक नेत्रदान दिनाच्या निमित्ताने मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे.जिवंतपणी रक्तदान तर मरणोत्तर नेत्रदान हे श्रेष्ठदान आहे.
  मिठ्ठू आंधळे हे अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तीमत्व आहे.ते सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एस.टी.वाहक म्हणून कार्यरत आहेत.शालेय जीवनापासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रातीन अनाथ, वंचित तसेच गरीब 60 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.आजपर्यंत 29 वेळा रक्तदान,गेल्या शैक्षणिक वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील बीड,अहमदनगर, यवतमाळ, नागपूर, रायगड तसेच सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 150 हुन शाळाबाह्य, शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शाळेत दाखल केले. आहे.ते सदैव विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबवित असतात.त्यांचे आईवडील श्री.त्रिंबक आंधळे व सौ.सुलाबाई आंधळे यांचे आशिर्वाद सदैव खंबीरपणे सोबत आहेत.त्यांच्या समवेत सदैव त्यांच्या अर्धांगिनी सौ.वैशाली यांचा पण पाठिंबा आहे.त्यांना आजपर्यंत 10 हुन अधिक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या त्यांच्या धाडसी निर्णयाबद्दल समता शिक्षाच्या समन्वयक नुतनजी मघाडे,गेवराईचे जे.शि.विस्तार अधिकारी प्रविणकुमार काळम पाटील,श्रीवर्धनच्या आगारप्रमुख रेश्मा गाडेकर,श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.मधुकर ढवळे सर,समुपदेशक अनिल खंडाळे, अक्षय मिरजकर, तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.रियाज शेख, डॉ.राम धुमक सर, डॉ.किशोर गर्जे सर, डॉ.कानिफनाथ सारूक, डॉ.प्रविणकुमार फड,पत्रकार बापू गाडेकर,आल्ताफ कुरेशी,रामनगरचे मुख्याध्यापक गणेश चव्हाण,शिक्षिका शितल नाईकवाडे,माईंड क्लासेसचे नवनाथ पवार,फोटो एडिटर ब्रम्हनाथ कोकरे,परमेश्वर काळे, जिवन सिरसाट,सामाजिक कार्यकर्ते लहुराव मिसाळ,आर.आर.आबा बहिर तसेच एस.टी.संघर्ष ग्रुप महाराष्ट्र, मनोजभाऊ पाटील,सुरेश यशवंतकर,संकेत नेहरकर,विकासभाऊ खाडे,सचिन ढेरे पाटील, रामराजे भताने,ललीता अहिरकर-देशपांडे,आराध्या (दामिनी) माने,सरिता पाटील,कवि महादेव ढोणे,गणेश गोरे- पानगांवकर, महा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा