श्रीवर्धनने मला तारले - खासदार सुनील तटकरे


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे श्रीवर्धन दौयावर आले असता शिस्ते ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला . यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाने मला तारले असल्याचे प्रतिपादन केले . या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष महंमद मेमन , तालुका अध्यक्ष दर्शन विचारे , अली कौचाली , मंदार तोडणकर , नंदू पाटील , अफजल मेमन , नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने , युवक जिल्हा उपाध्यक्ष अफझल मेमन , सरपंच चंद्रकांत चाळके , माजी सरपंच रमेश घरत , बबन घरत , शाम नाक्ती , नाना मोहिते , योगेश धुमाळ , दशरथ घरत , रेवती मोहिते आदी उपस्थित होते . खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की , गुहागर , पेण , दापोली , महाड या चार विधानसभा मतदारसंघांतून २६ ते २७ हजार मतांच्या पिछाडीवर असताना एक मतदारसंघ असा निघाला की त्याने चार मतदारसंघाची पिछाडी भरून काढली आणि तो मतदारसंघ म्हणजे श्रीवर्धन , त्यामुळे येथील जनतेचे अंत : करणातून ऋण व्यक्त करण्यासाठी आलो आहे . केंद्राच्या योजना मतदारसंघात आणणार असल्याचे खासदार तटकरे म्हणाले . महिलांसाठीदेखील विविध योजना केंद्रात आहेत त्या योजना या मतदारसंघात आणण्यात मागचे खासदार कमी पडले , परंतु आपण शासनाच्या प्रत्येक योजना गावागावात , खेडोपाडी पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहे , अशी ग्वाही तटकरे यांनी दिली . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा