म्हसळा (बाबू शिर्के)
रायगड लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचे नंदू शिर्के यांनी म्हसळा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडे दिला आहे. म्हसळा तालुक्यातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते. हा राजीनामा कोणाच्या दबावाखाली किंवा कोणी आदेश दिला म्हणून नाहीतर शिवसेना नेते अनंत गीते यांचा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून देत आहे.असे नंदू शिर्के यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलताना सांगीतले. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे मताधिक्य आणखी किती वाढेल यासाठी प्रयन्त करणार आणी यापुढे कोणालाही तालुका प्रमुखाची जबाबदारी दिली तर त्याचा नेतृत्वाखाली निष्ठेने काम करून संघटनेने माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा पर्यंत करीन आणी ज्यांनी मला मागील तीन वर्षात तालुका प्रमुख असताना साथ दिली त्यांचेही त्यांनी आभार मानले.
जर नंदू शिर्के यांचा राजीनामा मंजूर झाला तर पुढील तालुका प्रमुख कोण असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment