सुजल करावडे पाष्टी हायस्कुलमध्ये प्रथम...



जयसिंग बेटकर
                      नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत माध्यमिक शाळेच्या निकालामध्ये पी. एन. पी. माध्यमिक शाळा पाष्टी शाळेचा एकुण निकाल ८३.८७% लागला आहे. या माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता १०वी मध्ये प्रथम क्रमांक कु. सुजल कैलास करावडे ८३.२०%, द्वितीय क्रमांक कु. पियुष किसन रिकामे ७२.८०%,  तृतीय क्रमांक कु. तेजस अनंत मौले ६८.४०%  यांनी मिळवले आहे. हे तिनही विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. घरच्या अनेक अडचणींवर मात करुन त्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. तरी या विद्यार्थ्यांचे व शाळेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
                        शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुदाम माळी सर, सोनावणे सर, प्रफुल पाटील सर, ललित पाटील सर, बिलाल सर, संदिप दिवेकर व सर्व शालेय शिक्षक वृंद यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
                       शालेय स्थानिक शाळा समितीचे चेअरमन श्री. शांताराम कांबळे, सरपंच चंद्रकांत पवार, उपसरपंच धनश्री मुंडे. माजी सरपंच श्रीपतशेठ मनवे,  राजाराम धुमाळ, सहदेव खामकर, सुरेश कुले, रविंद्र कुले, विजय डोंगरे, बाळकृष्ण करावडे, समिती सदस्य जगजीवन लाड.शंकर गोरिवले व इतर सदस्य तसेच पालकवर्ग व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा