एक हात मदतीचा ; आई गावदेवी मित्र मंडळ व डान्स ग्रुप खारगाव बु. यांचा स्तुत्य उपक्रम


राकेश नाक्ती : खारगाव
खारगाव बु .येथील  सामाजिक मंडळाकडून "एक हात मदतीचा - विदयार्ध्यांच्या उज्वल भविष्यासाठी " या संकल्पनेअंतर्गत आई गावदेवी मित्र मंडळ व आई गावदेवी डान्स ग्रुप खारगाव बु. या मंडळांनी गावातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यँतच्या विध्यार्थी- विध्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य देऊन एक मदतीचा हात पुढे केला आहे . तसेच या दोन्ही मंडळांनी गावात वृक्षारोपण करून एक फळ झाड व एक फुलझाडं देऊन विध्यार्थी वर्गांना वाटप केलं. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापण कमिटी चेयरमन महादेव गायकर , प्राचार्य बिचुकले सर ,गावदेवी मित्र मंडळ अध्यक्ष कुणाल कांबळे , आई गावदेवी डान्स ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र कांबळे ,सल्लागार दीपक म्हात्रे उपस्थित होते. शिक्षण हे प्रवित्र कार्य आहे व ते समाजासाठी कश्या पद्धतीने उपयोगी ठरेल ,या बाबत मोलाचा आई गावदेवी मित्र मंडळाचे प्रवक्ते मंगेश पांडव यांनी विदयार्थी व पालकांना दिला . सल्लागार दीपक म्हात्रे यांनी सांगितले की आपण ज्या समाजात, गावात जन्मलो त्या समाजातील गरिब घटकांसाठी आपण काहीतरी देणं लागतो या उदान्त हेतूने त्याचप्रमाने शिक्षणाची गोडी वाढवी या साठी विद्यार्धीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थाना पर्यावरण व वृक्ष लागवड या बाबत माहिती मिळावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . तसेच झाडे लावा - झाडे जगावा या संकल्पनांचे महत्व प्रतीक भायदे ,राकेश नाक्ती ,प्रशांत पांडव या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

     या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आई गावदेवी मित्र मंडळाचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा