संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील वरवठणे,खरसई गावाच्या पश्चिमेस नौशाद शिरशिकर यांचे काळंबी फार्म हाऊस मध्ये काम करित असताना नेपाळ मधीलल युवक अर्जुन दंगोडा थारु वय वर्षे 20,मुळचा राहणार कमलीचुहा,नगरपालिका वार्ड क्रं.8 याला विजेचा शॉक लागुन त्याचा जागीच मृत्यू होण्याची घटना दिनांक 24 जुन 2019 रोजी सकाळी 11 वाजताचे दरम्यान घडली आहे.
घटनेची खबर म्हसळा पोलीस ठाण्यात मयताचा जोडीदार राजकुमार काळूराम चौधरी,रा.नेपाळ,वय वर्षे 24 याने दिल्या वरून म्हसळा पोलिसांनी आकस्मात मृत्यु रजिस्टर नंबर 10/2019,सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद केली आहे.घटनेची अधिक माहिती घेतली असता मौजे वरवठणे येथील नौशाद शिरशिकर यांच्या मालकीचे खरसई गावाचे पश्चिमेस समुद्र खाडी किनारी कोलंबी फार्म हाऊस कार्यान्वित आहे या फार्मवर नेपाळ राज्यातील युवक नोकरी करतात.कोलंबी प्रकल्पात पाणी शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित असताना मयत युवक अर्जुनला विजेचा जोरदार धक्का लागुन तो जागीच गतप्राण झाल्याची घटना घडली. घटनेची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात उशिरा करण्यात आली होती.घटने बाबत माहिती मिळताच म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांंसह घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला,तपास प्रथम पोलीस नाईक होडशीळ -827 यांच्याकडे व आता गणेश भोईर हे करीत आहेत.मयत अर्जुन याचे शव त्याचे नेपाळ देशातील मुळगावी पाठविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी चर्चा आहे.

Post a Comment