दिवेआगर समुद्रकिनारी पसरलेले शिंपले वेचण्यासाठी स्थानिकांची गर्दी



टीम म्हसळा लाईव्ह 
दिवेआगर किनारी शिंपले  नेहमी येत असतात. यावेळी हे प्रमाण अधिक आहे. वायू चक्रीवादळाने समुद्र खवळलेला होता. तर किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी होते. चक्रीवादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावरील पाणी ओसरल्याने वाळूत रुतून राहिलेले शिंपले समुद्र किनारी दिसू लागले आहेत.

मागील 2 दिवसांपासून दिवेआगर समुद्रकिनारी शिपल्यांचा सडा पसरला असून ते वेचण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. समुद्र किनारी शिंपल्याची चादर पसरल्यासारखे दृश्य यामुळे तयार झाले आहे. समुद्रात आठवड्यापूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला होता. बदललेल्या वातावरणामुळे समुद्रातील छोटे जीवजंतू हे समुद्रकिनारी लाटांद्वारे आलेले आहेत. या लाटांच्या वेगाने शिंपले हे समुद्र किनारी आलेले आहेत. समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावर शिपल्याचा सडा पसरलेला दिसत आहे.
दिवेआगर समुद्र किनारी गेल्या दोन दिवसांपासून हे शिंपले आले असून पर्यटकांनी व स्थानिकांनी हे वेचून घरी नेले आहेत. समुद्रातून किनाऱ्यावर आलेले हे शिंपले नागरिक घरी नेत असले तरी ते खाण्यासाठी चविष्ट नाहीत. मात्र शोभिवंत वस्तू साठी  या शिपल्यांचा उपयोग होऊ शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा