जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस म्हसळ्यात : बळीराजा सुखावला. म्हसळ्यात पर्जन्यमान २८५ मी.मी.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
तालुक्यात भात पिकाखाली क्षेत्र २४०० हेक्टर तर नाचणीचे क्षेत्र ४०० हेक्टर आहे. भाताचे पेरणी  क्षेत्र -२४० व नाचणी ४० हेक्टर आसल्याचे कृषि विभागाने माहीती दिली. कर्जत ७, जया, सुवर्णा, चिंटू, जोरदार, इंद्रायणी, वाडा कोलम या जातीचे भात बियाणे शेतकऱ्यानी वापरले आहे. पंढरीनाथ, कोकण सफेद, लाल नाचणी, दापोली २ ह्या जातीचे नाचणीचे बियाणे वापरले आहे. जिल्ह्यांत सरासरी पर्जन्यमान ४.७४ %, आहे. म्हसळा तालुक्यात ते ८.०७ आहे. आज पर्यंत म्हसळ्याचे पर्जन्यमान २८५ मी.मी. झाले आहे. उशीरा का होईना पण पाऊस दमदार पडत आसल्याने शेतकरी उखळ (लावणी पूर्व मशागत ) च्या कामात मग्न आहे.

" तालुक्यात भात, नाचणीची संकरीत व सुधारीत बियाणे शेतकऱ्याना पुरवीली आहेत. समाधान कारक पाऊस व हवामान आसल्याने रुजवा उत्तम आहे. येत्या ८ते १० दिवसात लावणी सुरु होईल.रायगड जिल्ह्यांत व तालुक्यात सोमवारी, मंगळवारी मध्यम पाऊस झाला तो आवण वाढीसाठी पोषक आहे, पुढील दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
सुजय कुसाळकर, मंडळ कृषी अधिकारी, म्हसळा.

तालुक्यातीत बहुतांश शेतकऱ्यानी पाऊस उशीरा येण्याच्या संकेतानी पेरणी उशीरा केल्यामुळे आवणाची वाढ योग्य झाली आहे. येत्या ८-१० दिवसांत लावणी सुरु होईल.
अनिल महामुनकर, अभ्यासू शेतकरी. देवघर -म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा