प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेली वडवली आगरी युवा संघटना दरवर्षी काही विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च हा या संघटनेच्या माध्यमातून केला जातो. यावर्षी ही या संघटने पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेे असून त्यांचा शैक्षणिक खर्च ही संघटना करणार आहे. तसेच वडवली आगरी युवा संघटना मुंबई माध्यमातून वडवली गावातील आगरी समाजातील शैक्षणिक दत्तक घेतलेल्या मुलांना वार्षिक २०१९-२० साठी शैक्षणिक साहित्य वह्या,कंपास,बॅग, छत्री,गणवेश,वार्षिक परीक्षा फी, पाणी बॉटल, टिफिन, शूज व इतर शालेय उपयोगी वस्तू त्यांच्या राहत्या घरी जाऊन देण्यात आलेत हे शालीय वस्तू वाटप करण्यासाठी वडवली आगरी युवा संघटना मुंबई सचिव श्री.मयूर बिराडी , सल्लागार -श्री. मंगेश रामा कांबळे, श्री. अनिल हरू नाक्ती, श्री.श्याम काळ्या कांबळे ,श्री. रोहित राजेंद्र खानलोस्कर तसेच सहकार्य सामाजिक शिक्षण संस्था अध्यक्ष श्री. निलेश बारक्या नाक्ती उपस्थित होते.

Post a Comment