संजय खांबेटे म्हसळा
अतिवृष्टी , महापूर, दरडी कोसळणे, साथीचे रोग या सारव्या नैसर्गिक अपत्तीत जिवित व वित्तहानी टाळावी व नागरिकांचे जीवनमान सुरळीत व पूर्ववत सुरु व्हावे यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर व्यवस्थापन करण्यात येते. म्हसळा तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे केलेले नियोजन हे कागदी घोडेच ठरले आहेत.
सदर बैठकीला अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम, बी.एस.एन.एल. , पशुधन विकास, तालुका आरोग्य अधिकारी, अधिक्षक ग्रामिण रुग्णालय म्हसळे ह्या खात्यानी दांडी मारली. बैठकीला खात्यानी प्रतिनिधी पाठवू नये असे स्पष्ट आदेश असताना १० खात्यांनी प्रतिनिधी पाठविणे पसंत केले. खातेप्रमुख परीक्षेत्र वन अधिकारी व एम .एम.आर.डी. ए. चे अधिकारी उपस्थित होते.
बहुतांश खात
प्रशासनाला लोकप्रतीनिधी, एन.जी.ओ व प्रसिद्धी माध्यमांचा तिरस्कार
पावसाळ्यात गावात येणारे महापूर वा अन्य नैसर्गिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी सुरुवातीला गावकऱ्यांनाच हिमतीने सज्ज राहावे लागते. नंतर प्रशासनाला जाग येते असे अनेक प्रसंग घडत असताना प्रशासनाने लोकप्रतीनिधी, एन.जी.ओ व प्रसिद्धी माध्यमांना या बैठकीपासून लांब ठेवले.
नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. दरवर्षी सातत्याने येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी, अकस्मात येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी, अज्ञान तसेच माहितीचा अभाव यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी, कमीत कमी जीवित व वित्त हानी होईल याची खात्री करण्यासाठी आपत्तीला सहज बळी पडणाऱ्या वर्गाचे रक्षण करण्यासाठी, आपत्तीनंतर दैनंदिन जीवन उध्वस्त होऊ नये याची तयारी करावी लागते. यासाठी सर्वप्रथम पोहचणारे व प्रशासनाला मदत करणारे लोकप्रतीनिधी,एन.जी.ओ व प्रसिद्धी माध्यमांचा प्रशासनाला तिरस्कार आसल्याने या मंडळीना बैठकीला बोलवले नसल्याचे समजते.
आरत्ती व्यवस्थापनात सर्वांची गरज असते पाणी, उधाण व अन्य कामासाठी जसे उत्कृष्ट पोहणारे लागतात तेंव्हा कोळी समाजाचे युवक चांगले कार्य करतात. तसे आपत्ती काळात सर्वांचीच आवश्यकता असते.
-महादेव पाटील, मा.सभापती पं.स. म्हसळा
पाभरे पुलाखाली ५ वर्षापूर्वी पडलेले झाडा ( लाकडी ओंडका) उथव अगर पुर आल्यास पुलाचे पीलरना डॅमेज होऊ शकते ह्याची माहीती प्रसार माध्यमांच्या तर्फ संबधीताना देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही हे नागरिकांचे दुर्देव आहे.
भाई मुसद्दीक , शेतकरी,म्हसळा
Post a Comment