म्हसळ्यामध्ये प्रवाश्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर्सचा धुमाकूळ : वाहतूक पोलिसांच्या नजर चुकीचा एसटी महामंडळाला फटका :
निकेश कोकचा : म्हसळा ( प्रतिनिधी )
प्रवाश्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ३ ते ४ टेम्पो ट्रॅव्हलर्सने म्हसळा शहरासहीत संपुर्ण तालुक्यात धुमाकूळ घातला असून, या बेकायदेशीर प्रवाशी वाहतूकीकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष करीत असल्याने याचा फटका थेट एसटी महामंडळाला बसत आहे.
म्हसळा शहरातील बसस्थानक व बस स्थानकापासून शंभर मिटरच्या आतमध्ये प्रवाश्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर्स उभ्या असतात. या टेम्पो ट्रॅव्हलर्सचे मालक व चालक थेट एसटी बस मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांवर लक्ष ठेऊन असतात. एखादी बस वेळेवर न आल्यास टेम्पो ट्रॅव्हलर्स चे मालक बसस्थानक परिसरामधूनच मोठया चालाकीने प्रवाश्यांना त्याच्या गाडीत बसण्यासाठी भाग पाडत असल्याचे निदर्शनास येते. म्हसळा शहरातील बस स्थानक परिसरामध्ये वाहतुक पोलिसांच्या नजरेसमोर चाललेल्या या प्रवाश्यांच्या बेकायदेशीर वाहतूकीमुळे एसटी महामंडळाला दिवसाखेरीज तब्बल एक लाख रुपयांपेक्षाही जास्त चा गंडा प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलर वाले घालत आहेत. या बेकायदेशीर वाहतुकीची एखादी तक्रार आल्यानंतर वाहतूक पोलिस त्यांच्यावर शुल्लक दंडाची कारवाई करतात. कारवाई झाल्यानंतर हे टेम्पो ट्रॅव्हलर्स घनसार कॉम्पलेक्स किंवा अंजुमन हायस्कूल येथून आपला बेकायदेशीर वाहतूकीचा धंदा सुरू ठेवतात.विशेष म्हणजे हे दोन्ही ठिकाण वाहतूक पोलिसांच्या चौकीपासून २० ते ३० मिटरच्याच अंतरावर आहेत.
शहरातील बसस्थानकावर बेकायदेशीर पणे आपल्या गाड्या लाऊन प्रवाशी वाहतुक करणाऱ्यां व वारंवार वाहतुक कोंडी करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव म्हसळा नगरपंचायतीमध्ये २४ जुनच्या आमसभेमध्ये सर्वानू मते मंजुर करण्यात आला आहे. नगरपंचायतीनेही बसस्थानकाच्या परिसरात अथवा १०० मिटर आतमध्ये बेकायदा गाडयालावून वारंवार वाहतुक कोंडी करणाऱ्यांगाडयांवर कारवाईचा ठराव मंजुर केल्यानंतर ,वाहतुक पोलिस या संदर्भात कारवाई करतात की नाही याकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment